दुपारी दुकानात झाला वाद, रात्री झोपेतच सहकाऱ्याने चिरला कामगाराचा गळा!

दुपारी दुकानात झाला वाद, रात्री झोपेतच सहकाऱ्याने चिरला कामगाराचा गळा!

विरारमध्ये पैशाच्या वादातून एका बेकरी कामगाराची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

विरार, 20 मार्च : विरारमध्ये पैशाच्या वादातून एका बेकरी कामगाराची झोपेतच गळा चिरून निर्घृण  हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रियासत अली अन्सारी (30) असं या मयत कामगाराचे  नाव असून शाबूत शेख असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

विरार पूर्व पाच पायरी इथं डीलक्स नावाची बेकरी आहे. या बेकरीमध्ये रियासात आपल्या साथीदारांसह कामगार म्हणून राहत होता.

बुधवारी सकाळी  गिऱ्हाईकांच्या पैशावरून रियासत व शाबूत या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. याचा राग मनात ठेवून नेहमीप्रमाणे बेकरीतील सर्व कामगार झोपल्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाबूत शेख हा रियासात झोपला असलेल्या खोलीत धारधार शस्त्र घेऊन गेला.

कुणी आपल्याला बघत नसल्याची रेकी त्याने केली त्यानंतर  धारधार शस्त्राने रियासात याच्या मानेवर वार करून बाजूच्या खोलीत पळ काढला.

ही हत्या लपविण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, बेकरी मालकाने कामगारांच्या खोलीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी शाबूत शेखला अटक करण्यात आली आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस निरीक्षकानेच  महिलेला बेदम मारहाण          

दरम्यान, न्याय मागण्यांसाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनीच मारहाण केल्याचा धक्कादायक  प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडला आहे.  परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक इकबाल सय्यद यांनी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेला लाथा बुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या महिलेनं पोलीस अधीक्षक यांना केलेल्या तक्रारी नंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर महिला तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली असता पोलिसाने हे संतापजनक कृत्य केले आहे.

ही महिला आपल्या पती आणि नणंदेविरूद्ध तक्रार दाखल करून घेण्याची विनंती या पोलीस निरीक्षकाला करत होती. पीडित महिला पोलीस निरीक्षकास मला मारू नका, अशी हात जोडून विनवणी करत होती, तरी देखील या खाकी वर्दीत असलेल्या पोलिसाने थोडीही दया दाखवली नसल्याचे सदर पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

त्या महिलेची मागणी ऐकून न घेता, इकबाल सय्यद यांनी ठाण्यासमोर उभ्या असलेल्या या महिलेला चल तुझे नावे घालतो , किती नावे घ्यायची?, पोच पाहिजे का  तुला? असे म्हणून मारहाण केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने पोलीस निरिक्षकावर केला आहे.

या बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षकाना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचं खंडन केलं आहे. दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक या पोलीस अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे.

First published: March 20, 2020, 11:39 AM IST

ताज्या बातम्या