गृहिणी ते 'वस्ताद', पहेलवान सुनिताताईंचा थक्क करणारा प्रवास!  

गृहिणी ते 'वस्ताद', पहेलवान सुनिताताईंचा थक्क करणारा प्रवास!  

मात्र अकोल्यातील सुनिता कडोळे या सर्वसामान्य महिलेने कुस्ती शिकण्याचे आणि खेळण्याचं स्वप्न पाहिलेय. तिच्या या स्वप्नाला वास्तवतेच बळ देत तिच्या पतीने तिला कुस्तीचे धडे दिलेय.

  • Share this:

कुंदन जाधव, अकोला,ता.20 जून : कुस्तीत आजही पुरुषांचीच मक्तेदारी, त्यामुळे सर्वसामान्य घरातील स्त्रीनं कुस्ती खेळणं तर दूरच, मात्र पाहणंही अवघडच.. मात्र अकोल्यातील सुनिता कडोळे या सर्वसामान्य महिलेने कुस्ती शिकण्याचे आणि खेळण्याचं स्वप्न पाहिलेय. तिच्या या स्वप्नाला वास्तवतेच बळ देत तिच्या पतीने तिला कुस्तीचे धडे दिलेय.

सुनिता अकोल्यातील जवाहरनगर भागात भाजीपाल्याचे दुकान चालवीतात. मात्र आपल्या तुटपुंज्या मिळकतीतही आज सुनिताताई महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुस्तीचे फड गाजवतांना दिसतात. परिस्थिती बेताची असतांना आता या महिलेने पतीसह अकोल्यातील मुलींना कुस्तीचे धडे द्यायला प्रारंभ केलाय. आज त्यांच्याकडे कुस्ती शिकणाऱ्या अनेक मुलीं कुस्तीमुळे शासकीय सेवेत कार्यरत झाल्यात.

डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक

राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला दिली मंजुरी

ग्रामीण भागातील बाईचं आयुष्यं संसाराच्या गाड्यात अडकलेलं घर सांभाळत घराला हातभार लावण्यात आयुष्यं खपतं, ग्रामीण भागीतील एका गृहिणीच्या पायातले सगळे समाजिक साखलदंड तोडून सुनिताताईंनी आपली एक ओळख बनवलीय.

कदाचित विश्वास बसणार नाही पण 46 वर्षांच्या सुनीताताई आजीही आहेत.  एक कुस्तीपट्टू आणि कुस्तीचे धडे देणाऱ्या 'वस्ताद' आहेत. कुस्तीत आजही पुरुषांचीच मक्तेदारी...त्यात समाज आणि नातेवाईंचा विरोध झेलून त्यांनी अनेक मैदानं मारली... साथ होती ती फक्त पतीची.

'या' देखण्या आयपीएस अधिकाऱ्या प्रेमासाठी तरूणीने सोडलं 

जगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ !

सुनिता यांचे पती मोरेश्वर यांना लहानपणापासूनच कुस्तीचं प्रचंड वेड. घरची परिस्थिती बेताची...तरीही अनेक मैदानं मारत त्यांनी 'पैलवान' म्हणून नाव कमावलं. लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीला कुस्ती शिकविण्याचा आणि कुस्ती

खेळवण्याचा निर्णय घेतला. त्याला घरातूनच प्रचंड विरोध झाला पण ते मागे हटले नाहीत.

कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या सुनिता यांनी 'मोरेश्वर महिला कुस्ती संस्थेची स्थापन केलीयं. त्यात अकोला आणि परिसरातील अनेक मुली मुली कुस्तीचे धडे गिरवरताहेत. अनेकींना शासकीय सेवेत नोकरीही मिळालीय.

डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक

कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट 

सुनिता यांना एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांनाही कुस्तीत करिअर घडवायचंय. त्यांची मुलगी माधुरीनं 'विदर्भ केसरी' स्पर्धेत सलग दोन वर्ष सुवर्ण पदक पटकावलंय. माधुरीची मुलगीही आपल्या चिमुकलीला आत्तापासून कुस्तीचे धडे देतीय.

सुनिताताईसारख्या पैलवान आज्जींनी कुस्तीच्या आखाड्यात उतरून पुरुषांच्या मक्तेदारीला हादरा दिलाय...ग्रामीण भागात राहून सगळं सहन करत कर्तृत्व गाजवणं ही मोठी सांस्कृतिक आणि समाजिक दंगल असते ती त्या रोज लढताहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 05:40 PM IST

ताज्या बातम्या