Elec-widget

मंत्रालयासमोर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या परिसरात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीये. मंत्रालयाच्या गेटसमोर एका महिलेनं स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : मंत्रालयाच्या परिसरात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीये. मंत्रालयाच्या गेटसमोर एका महिलेनं स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी तिच्याकडे धाव घेतली आणि  तिला तसं करण्यापासून रोखलं. त्यामुळे थोडक्यात या महिलेचा जीव बचावला आहे. यासगळ्या प्रकाराने मंत्रालय परिसर हादरून गेला आहे.

VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका

राधाबाई साळुंखे अंस या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचं नाव आहे. त्या मुळच्या बीड जिल्ह्याच्या आहेत. राधाबाई यांनी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल सदर महिलेच्या विरोधात लागला असल्याने राधाबाई यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. मत्रांलय सुरक्षा विभागने तात्काळ सदर महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्हच्या पोलीस ठाण्यात नेलं आहे.

दिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले

याआधीही जानेवारी महिन्यात धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने  विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून हर्षल रावते या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. त्यानंतर गौतम चव्हाण या व्यक्तीने मंत्रालयाच्या गेटसमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. झोपडपट्टी पुर्नविकास योजनेत प्रलंबित काम होत नसल्याच्या रागातून मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी गेटवर विष प्राशान केलं होतं. सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन गौतम चव्हाणांना अडवलं आणि त्यांचा थोडक्यात जीव वाचला होता.

Loading...

हेही वाचा...

पालघरमध्ये एका झाडाने वाचवला 90 जणांचा जीव

मराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोप

घर बसल्या केले हे व्यायाम तर नाही करणार कंबर आणि पाठदुखीची तक्रार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...