ऑफिसमधून निघण्यासाठी उशीर झाला तर या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा!

ऑफिसमधून निघण्यासाठी उशीर झाला तर या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा!

कामावरून घरी जाण्यासाठी जर उशिर झाला तर महिलांनी घाबरून जाऊ नका. तर परिस्थितीशी दोन हात करा. महिलांची सुरक्षा त्यांच्या स्वत: च्या हातात आहे फक्त त्याची थोडीशी जाणीव असणे आवश्यक आहे.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : 16 डिसेंबरच्या रात्री निर्भयाबरोबर झालेल्या घटनेनं प्रत्येक स्त्रीचा आत्मा हादरला. निर्भयाबरोबर जे घडलं त्यानंतर प्रत्येक मुली आणि स्त्रीमध्ये अशी भीती असते की त्यांच्या बाबतीतही काहीतरी चुकीचं घडेन. आणि याची भीती असणारच कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याराच्या धक्कादायक घटना समोर आल्या.

समाजासाठी भलेही ही एक सर्वसाधारण घटना आहे, परंतु स्त्री आणि तिच्या कुटुंबासाठी तो आयुष्यभराचा त्रास असतो. अशा परिस्थितीत, कामावरून घरी जाण्यासाठी जर उशिर झाला तर महिलांनी घाबरून जाऊ नका. तर परिस्थितीशी दोन हात करा. महिलांची सुरक्षा त्यांच्या स्वत: च्या हातात आहे फक्त त्याची थोडीशी जाणीव असणे आवश्यक आहे.

एकाकी रस्त्यावर एकटं जाणं टाळा

ऑफिसवरून निघण्यासाछी उशीर झाल्यास, अंधारात रस्त्यावर तुम्ही एकटेच जाणं टाळा. शक्य असल्यास, ऑफिसमधून निघण्यापूर्वी एक टॅक्सी किंवा ऑटो बुक करा. तथापि, हे लक्षात ठेवा की कॅबमध्ये बसण्यापूर्वी किंवा ऑटोमध्ये आपला नंबर आपल्या ओळखीच्या एखाद्यास द्या म्हणजे ते आपला सहजपणे मागोवा घेऊ शकतात.

धक्कादायक; मुंबईच्या गर्दीने घेतला तरुणीचा जीव, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

सुरक्षेची साधने नेहमीच सोबत ठेवा

मुलींनी सुरक्षिततेची साधने नेहमी बॅगमध्ये ठेवावीत. यासाठी प्रत्येक मुलीला पेपर स्प्रे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आपण नाकाजवळ, तोंडावर, आक्रमणकर्त्याच्या डोळ्यात घालू शकता. बचावासाठी ही सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बॅगमध्ये स्‍टन गनही ठेवली पाहिजे. याद्वारे आपण आपले स्वतःचे संरक्षण सहजपणे करू शकता. जर कोणी समोरून भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यास लाथ मारून जखमी करा आणि 100नंबरवर कॉल करा.

मुलींनी स्वत: च्या सुरक्षेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की, संशयास्पद व्यक्ती आपला पाठलाग करत आहे किंवा तुम्ही काही अडचणीत असाल तर ताबडतोब कॉल करा आणि 100 नंबरवर कळवा. मुलींनी कधीही स्वत: ला दुर्बल समजू नये. ती प्रत्येक परिस्थितीस धैर्याने आणि ताकदीने सामोरं जाऊ शकते. मुलींचं हृदय खूप मजबूत असतं. मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकते.

इतर बातम्या - माहिम सूटकेस हत्याकांडात आधार कार्डामुळे नवं ट्वीस्ट, आरोपी लेकीबद्दल खुलासा

हेडफोन घालून चाला

ऑफिसमधून निघाल्यानंतर जर तुम्हाला सुनसान रस्त्यावरून चालण्याची वेळ आली तर कानात हेडफोन घालून चाला. त्यामध्ये गाणी वाजवू नका, परंतु एखादी व्यक्ती आपल्यामागे येत असल्याचे आपल्याला वाटत असल्यास, तत्काळ कॉल करा आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तीला याची माहिती द्या.

आरडा-ओरड करा

चालत असताना अचानक एखाद्याने छेडछाड केली तर आरडा-ओरड करा आणि जवळच्या लोकांना मदतीसाठी कॉल करा. लोकांच्या जमावामुळे, हल्लेखोर घाबरतील आणि तेथून पळून जातील.

इतर बातम्या - कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

Published by: Renuka Dhaybar
First published: December 18, 2019, 1:40 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading