धक्कादायक! भर रस्त्यात महिलेवर चाकूने सपासप वार, जागीच मृत्यू

भर रस्त्यामध्ये ऐन गर्दीच्या वेळी महिलेवर असा चाकू हल्ला झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 10:17 PM IST

धक्कादायक! भर रस्त्यात महिलेवर चाकूने सपासप वार, जागीच मृत्यू

बारामती, 17 जून : बारामतीमध्ये स्टेडियमजवळ एका महिलेवर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या चाकू हल्ल्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भर रस्त्यामध्ये ऐन गर्दीच्या वेळी महिलेवर असा चाकू हल्ला झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर हत्या झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचताच महिला मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

पोलिसांनी घटनास्थळावरून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयांत पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यदर्शींची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत.

भर रस्त्यात महिलेवर वार करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस बघ्यांची गर्दी कमी करत आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी परिसरातले सीसीटीव्ही तपासण्याचे येणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Loading...

VIDEO : जागा तुम्ही निवडा, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...