धावत्या ट्रेनमध्येच महिलेनं दिला बाळाला जन्म

नागपूरनंतर ट्रेनला थेट मध्यप्रदेशात इटारसीपर्यंत थांबा नसल्यामुळे काळजीत अधिकच भर पडली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 01:02 PM IST

धावत्या ट्रेनमध्येच महिलेनं दिला बाळाला जन्म

प्रशांत मोहिते, नागपूर, 4 ऑगस्ट : रामेश्वरम ते मंडूवाडीह या एक्स्प्रेस गाडीमध्येच एका महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. नागपुर येथून गाड़ी सुटल्यानंतर पुनमदेवी विश्वकर्मा या 24 वर्षीय महिलेच्या पोटात कळा येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर ट्रेनमध्येच त्यांची प्रसुती झाली.

पुनमदेवी विश्वकर्मा या पतीसह चेन्नईवरून उत्तरप्रदेशात मूळ गावाला जात होत्या. यावेळी त्यांच्या पोटात कळा येण्यास सुरुवात झाली. ट्रेनमध्ये डॉक्टर आहे का, याचा शोध सुरू केला गेला. मात्र ट्रेनमध्ये डॉक्टर सापडला नाही.

नागपूरनंतर ट्रेनसाठी थेट मध्यप्रदेशात इटारसीपर्यंत थांबा नसल्यामुळे काळजीत अधिकच भर पडली होती. अशातच ट्रेनमधील काही महिला प्रवाशी पुनमदेवी यांच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी धावत्या ट्रेन मध्येच महिलेची प्रसूती पार पाडली.

या सर्व घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. त्यानंतर सूत्र हालली आणि नरखेड रेल्वे स्थानकावर थांबा नसताना मेडिकल इमर्जन्सी म्हणून ट्रेन थांबवली गेली. थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर 108 रुग्णवाहिका आणि आई व बाळाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. विशेष म्हणजे महिला आणि तिचे बाळ दोघेही सुखरुप असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे.

VIDEO: ऑन द स्पॉट शिक्षा, विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्याला महिलांनी बेदम धुतलं!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagpur
First Published: Aug 4, 2019 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...