मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याचा कुरिअर बॉयला आला राग, महिलेवर केला हल्ला

मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याचा कुरिअर बॉयला आला राग, महिलेवर केला हल्ला

घरी आलेला कुरिअर बॉय हा हिंदी भाषेमध्ये बोलत होता. तो महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे त्याने मराठीत बोलावा असा हट्ट महिलेने धरला.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : महिलेने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यामुळे कुरिअर बॉयने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कुरिअर बॉयने 45 वर्षीय महिलेवर पेनाने वार केल्याचं समोर आलं आहे.

घरी आलेला कुरिअर बॉय हा हिंदी भाषेमध्ये बोलत होता. तो महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे त्याने मराठीत बोलावा असा हट्ट महिलेने धरला. कुरिअर बॉय मुळचा पश्चिम बंगालचा आहे. पण त्याने मराठीत बोलावं असा महिलेने आग्रह धरला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

यामध्ये महिलेसोबत दरवाजात त्यांची बहिणही उभी होती. कुरिअर बॉय आणि या दोन्ही महिलांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर गोष्ट हाणामारीपर्यंत गेली आणि कुरिअर बॉयने पेनाने महिलेवर वार केले.

यानंतर शेजाऱ्यांनी हे प्रकरण सोडवलं आणि जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यांनतर दुसऱ्या महिलेने कुरिअर बॉयला पोलीस ठाण्यात घेऊन जात, त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, मराठी भाषा बोलणं हे काही अनिवार्य नाही असं म्हणत तरुणाने शिवीगाळ केली आणि आवाज चढवून बोलण्यास सुरुवात केली. यानंतर त्याला महिलांनी दम भरला पण त्याच श्रणी त्यांनी दोघींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

VIDEO: तरुणीचं भन्नाट ड्रायव्हिंग, थेट शोरुमची काच तोडून आली बाहेर

First published: February 22, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading