उस्मानाबाद जिल्ह्यात पत्नीची बदनामी केल्याच्या रागातून महिलेची धिंड !

उस्मानाबाद जिल्ह्यात पत्नीची बदनामी केल्याच्या रागातून महिलेची धिंड !

उस्मानाबाद जिल्ह्यात पत्नीची बदनामी केल्याच्या रागातून एका महिलेची गळ्यात चपला घालून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

  • Share this:

23 डिसेंबर, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात पत्नीची बदनामी केल्याच्या रागातून एका महिलेची गळ्यात चपला घालून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. उमरगा तालुक्यातील आलुर गावातली ही घटना आहे. शिवानंद स्वामी याने हे दृष्कृत्य केलंय. शिवानंद स्वामी हा सैन्य दलात कार्यरत आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शिवानंद शिवानंद स्वामीला पोलिसांनी अटक केलीय.

पीडीत महिला ही आरोपीच्या पत्नीबाबत बदनामी करत असल्याच्या आरोपातून हा प्रकार घडलाय. गावात महिलेची धिंड काढल्याची माहिती मिळताच सरपंचांनी वेळीच हस्तक्षेप करून महिलेची सोडवणूक केली आणि तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकाराबाबत संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 01:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading