News18 Lokmat

आॅफिसमध्ये एका जागी बराच वेळ बसून काम केल्यानं 'या' आजारांना द्यावं लागतं तोंड

एका संशोधनानुसार एका जागी जास्त वेळ बसून काम केल्याचा त्रास स्त्रियांना होतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 04:53 PM IST

आॅफिसमध्ये एका जागी बराच वेळ बसून काम केल्यानं 'या' आजारांना द्यावं लागतं तोंड

मुंबई, 06 मार्च : आॅफिसमध्ये अनेक तास एका जागी बसून सगळेच जण काम करत असतात. त्याचा त्रासही होत असतो. पण एका संशोधनानुसार एका जागी जास्त वेळ बसून काम केल्याचा त्रास स्त्रियांना होतो.

अजिबात ब्रेक न घेता काम करणाऱ्या महिलांना आजारांना तोंड द्यावं लागतं. त्यांना हृदयरोग, डायबेटिस, एंडोमेट्रियल आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

एका जागी बसून काम केल्यानं फॅट्स बर्न होत नाहीत. रक्तवाहिन्या ब्लाॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयाचे आजार वाढतात. या संशोधनानुसार मेंदूवरही परिणाम होतो. मेंदूत नव्या आठवणी तयार करणारा भाग बिघडतो. त्यामुळे तणाव आणि डिप्रेशन वाढतं.

अजिबात ब्रेक न घेता एका जागी बसलं, तर महिलांमध्ये जाडेपणा वाढतो. कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढू शकतात. बराच वेळ बसल्यानं रक्तवाहिन्यांमधली एंझाइम चरबी बंद होते. त्यानं जाडेपणा आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर वाढतो.

अनेकदा स्त्रियांमध्ये मानेचं दुखणं, पायाचं दुखणं असतं. तेही एका जागी जास्त वेळ बसल्यामुळे. त्यामुळे आॅफिसमध्ये अधेमधे ब्रेक घेऊन तुम्ही बाहेर पाय मोकळं करून आलं पाहिजे.

Loading...

एका जागी जास्त वेळ बसून तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होईल. खाण्यापिण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे हल्ली अनेक काॅर्पोरेट आॅफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी व्यायाम करायला जागा असते. लंच टाइमला कँपसमध्ये फेरी मारायची सक्ती केली जाते.

शेवटी हेल्थ इज वेल्थ. आरोग्य चांगलं असणं जास्त महत्त्वाचं. त्यामुळे प्रत्येकानंच आॅफिसमध्ये या काही गोष्टींची काळजी घ्यायला हवीच. आरोग्य चांगलं राहिलं तर कामही छान होतंच.


केसातल्या कोंड्याने वैतागलात? या 5 घरगुती उपायांनी हमखास मिळेल आराम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...