पिंपरी-चिंचवड, 23 मार्च : तीन महिन्यांचा न दिलेला पगार मागितला म्हणून महिला सफाई कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक संघटनांकडून मारहाण करणाऱ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. एवढच नाही तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला नोटीस देऊन उत्तर मागितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साफ-सफाईचं काम करते. तिला तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. जेव्हा तिने पगार मागितला तेव्हा तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी पगार घ्यायला बोलावलं. महिला पुन्हा पगार मागायला आली तेव्हा तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं, यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि महिलेला मारहाण करण्यात आली.
मारहाणीच्या या प्रकरणात ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मालकाचा भाऊच आरोपी आहे. आरोपीकडून महिला जखमी होईपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना निगडीच्या सिटी प्राईड कॉम्प्लेक्समधली आहे.
साफ़ सफ़ाई करने वाली ने 3 महीने से रुकी हुई पगार माँगी तो मालिक ने बदले में बुरी तरह पीट दिया। शर्मनाक घटना महाराष्ट्र के पुणे की। pic.twitter.com/3Mf74QZiYL
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) March 22, 2023
निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
या प्रकरणी हर्षद कमाल खान वय 23 याच्यावर 354, 323, 504 सोबतच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. 42 वर्षांच्या महिलेने निगडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सुरूवातीला प्रकरण हलक्यामध्ये घेऊन अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर आणि महिलेसोबत झालेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलं आणि आरोपीवर गुन्हा दाखल केला. निगडी पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकऱणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.