S M L

महिलेला हात,पाय बांधून मारहाण, माहूर तालुक्यात तालिबानी प्रकार

अनैतिक प्रेम संबंधांच्या संशयातून महिलेला हात पाय बांधून अमानूषपणे मारहाण करण्यात आलीय. माहूर तालुक्यातील आसोली गावातील घटना आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 12, 2018 10:28 PM IST

महिलेला हात,पाय बांधून मारहाण, माहूर तालुक्यात तालिबानी प्रकार

नांदेड,ता.12 एप्रिल: आपण महाराष्ट्रात राहातो की तालिबानमध्ये असा प्रश्न पडावा अशी गंभीर घटना नांदेड जिल्हायतल्या माहूर तालुक्यात घडलीय. अनैतिक प्रेम संबंधांच्या संशयातून महिलेला हात पाय बांधून अमानूषपणे मारहाण करण्यात आलीय. माहूर तालुक्यातील आसोली गावातील घटना आहे. ही घटना घडत असताना अनेक जण बघत होते मात्र त्यांनी महिलेला वाचवण्यासाठी काहीही केलं नाही.

पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केलीय.  9 एप्रिलची ही घटना असून तक्रारीनंतर पोलिसांनी फक्त प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. शेवटी माध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर आज चार दिवसांनी पोलिसांनी 376 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 10:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close