दुबई, 13 फेब्रुवारी : क्रिकेटपटू आणि अफेअर यांचे जुने नाते आहे. त्यामुळं क्रिकेटपटूंच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत असतात. मात्र याच अफेअरचे वादही तेवढेच चर्चिले जातात. यात पाकिस्तानी खेळाडू सगळ्यात आघाडीवर आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूवर एका मुलीची फसवणूक केल्याचा आणि तिचा वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाकिस्तानी संघाचा खेळाडू शादाब खानने दुबई येथील एका मुलीने हे आरोप केले आहेत आणि काही गप्पा आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुबईच्या अशरैना सफियाने पाकिस्तान संघाचा खेळाडू शादाब खानवर अनेक आरोप केले आहेत. सफियाने तिच्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे, एक व्हिडिओ आणि एक मोठे कॅप्शन शेअर केले आहे. शादाबने तिच्याशी कसा संपर्क साधला तसेच, त्यांचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिल्याचे सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटूवर महिलेची फसवणूक केल्याचा हा पहिलाच प्रकार नाही आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघाचा सलामीवीर इमाम-उल-हकवरही अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. इमामच्या मुलींशी चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले.
यात आता शादाब खानदेखील अशाच एका प्रकरणात अडकला असून अशरैना सफियाचा पर्दाफाश केला आहे. या महिलेने असा दावा केला आहे, ते दोघे 2019मध्ये एकमेकांना भेटले होते. सफिया आणि शादाब यांच्यात इंग्लंडमधील आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. मात्र आता शादाबने तिला धमकी देत असल्याचे व्हॉट्सअप चॅट लीक झाले आहे.