पतीचा पिच्छा सुटावा म्हणून प्रेयसीवर करत होते अघोरी कृत्य आणि जादुटोणा, कापली केसांची बट!

पतीचा पिच्छा सुटावा म्हणून प्रेयसीवर करत होते अघोरी कृत्य आणि जादुटोणा, कापली केसांची बट!

आरोपीची पहिली पत्नी जया आणि पीडित महिला एकत्र राहत असल्याने त्या दोघीमध्ये सतत भांडण होत होते.

  • Share this:

भिवंडी, 09 जानेवारी :  भिवंडी शहरातील कामतघर येथील एका 28 वर्षीय महिलेवर अघोरी कृत्य करून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला अघोरी पूजेसाठी बसत नसल्याचे पाहून भोंदूबाबासह ३ साथीदारांनी तिला जबर मारहाण करून अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्यासाठी तिच्या डोक्यावरील केसांची बट कापली आहे.

ही खळबळजनक घटना भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये घडली आहे.या प्रकरणी पीडित महिलेने भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सुटका करीत नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपिंविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मनोज शंकर गोहिल,त्याची पत्नी जया गोहिल,विनोद चव्हाण , गुजराथी महाराज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. यातील भोंदूबाबासह आरोपी असलेले गोहिल दांपत्य आणि त्याचा चुलत भाऊ (सर्व, रा.चरणीपाडा,भिवंडी )  हे चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय  पीडित महिला भिवंडीतील कामतघर परिसरात पतीसह राहत होती. त्या दरम्यान आरोपी मनोज गोहिलशी तिचे प्रेमाचे सूत जुळल्याने तिने पहिल्या पतीला सोडून ती आरोपी मनोज बरोबर राहत होती. मात्र, काही महिन्यापूर्वी आरोपी मनोज गोहिल विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात त्यावेळी पोलिसांनी मनोजला अटक केली होती. त्यांनतर आरोपी मनोज जामिनावर सुटून बाहेर येताच पीडित महिला पुन्हा त्याच्यासोबत राहत होती. मात्र, त्यावेळी आरोपीची पहिली पत्नी जया आणि पीडित महिला एकत्र राहत असल्याने त्या दोघीमध्ये सतत भांडण होत होते. यामुळे पीडित महिलेवर अघोरी कृत्य आणि जादूटोणा करून तिच्यापासून पिच्छा सुटावा म्हणून आरोपी गोहिल दापंत्यानी चुलत भाऊ आणि एक गुजराथी भोंदूबाबाशी संगनमत करून पीडित महिलेला भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये नेऊन अघोरी पूजेसाठी बसवलं. मात्र, पीडित बसत नसल्याचे पाहून आरोपी गोहिल दापंत्याने भोंदूबाबासह तिला जबर मारहाण करून अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्यासाठी तिच्या डोक्यावरच्या केसाची बट कापली.

दरम्यान, पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला असता पोलिसांनी मनोज  गोहिल, त्याची पत्नी जया, चुलत भाऊ विनोदसह  गुजराथी भोंदूबाबावर  नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भादवी. कलम ३२४, ३२४, ५०४, ५०६, (२) ३४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदूबाबासह चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्र वाणी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2020 08:56 PM IST

ताज्या बातम्या