चक्क मुलीने केलं मुलाचं अपहरण, फोनवर सारखा म्हणायचा 'I LOVE YOU'

चक्क मुलीने केलं मुलाचं अपहरण, फोनवर सारखा म्हणायचा 'I LOVE YOU'

गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती तिला सतत त्रास देत होता. तिचा पाठलाग करायचा यावर कंटाळून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 01 फेब्रुवारी : एका 24 वर्षीय एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला हैद्राबादमधून गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेवर एका पुरुषाचं अपहरण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती तिला सतत त्रास देत होता. तिचा पाठलाग करायचा यावर कंटाळून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून या तरुणीसोबत फोनवर मेसेज पाठवून आणि तिला वारंवार फोन करून 'I LOVE YOU' असं म्हणायचा. यावर तरुणीने त्याला अनेक वेळा विरोध केला. पण तो काही ऐकायचा नाही. त्यामुळे रागात तरुणीने त्याचं अपहरण केलं.

हैद्राबादच्या गोपालपुरमच्या पोलिसांच्या सांगण्यानुसार, तरुणीला त्याने पहिल्यांदा त्याच्या मित्राच्या घरी पाहिलं होतं. जिथे तो कारपेंटरचं काम करण्यासाठी गेला होता. आणि त्यातूनच त्याने तिचा नंबर घेतला. त्यानंतर तिला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.

यानंतर या तरुणीने तिच्या मित्रांसोबत प्लान केला आणि त्याचं एका कॉलेजच्या परिसरातून अपहरण केलं. त्याचं अपहरण करून तरुणी आणि तिच्या मित्रांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

पण त्यांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी तो यशस्वी झाला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

मृत्यूचा LIVE व्हिडिओ, पुढे गेलेली दुचाकी कारने अशी आणली मागे

 

First published: February 1, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या