कोलकाता, 03 फेब्रुवारी : सोशल मीडियावर हाणामारीचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतात. अशात पश्चिम बंगालचाही महिलांना मारहाण करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या पायाला दोरी बांधून तिला रस्त्यावरून खेचून नेत आहेत. या जमावाचे नेतृत्व तृणमुल काँग्रेसचे (TMC) पंचायत नेते अमल सरकार यांनी केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात पोलीस चौकशी करण्यात येणार आहे.
महिलेला मारहाण करताना जेव्हा तिची बहिणीने विरोध करण्यासाठी आली तेव्हा तिलाही ढकलले आणि जमिनीवर फेकले. आरोपींकडून दोघींनाही बेदम मारहाण आणि अत्याचार करण्यात आले. सदर महिलेचा दोष असा होता की, पंचायतने बांधलेल्या रस्त्यासाठी तिची जमीन हडपण्यास विरोध केला होता. रविवारी टीएमसी जिल्हाप्रमुख अर्पिता घोष यांनी पंचायत नेते अमल सरकार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणतीही अटक झाली नाही. ही घटना दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील फाटा नगर गावची आहे.
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मरून रंगाची मॅक्सी घातलेल्या स्मृतीकोना दास यांना कशा प्रकारे मारहाण करण्यात येत आहे. एक माणसाने त्यांच्या पायाला दोरी बांधली आहे आणि बाकीचे लोक त्यांना रस्त्यावर खेचून नेत आहेत. त्यांची मोठी बहीण सोमा दास तिथे पोचल्यावर त्यांनी जमावाला आरडाओरडा करण्यास सुरवात केली. यानंतर, त्यांनाही जमिनीवर ओढलं गेलं मारहाण करण्यास सुरुवात केली.
इतर बातम्या - विधान परिषद की विधान सभा? निवडणुकीच्या प्रश्नावर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे
महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरासमोर 12 फूट रुंद रस्ता तयार करण्यात येईल, असे त्यांना यापूर्वी सांगितले गेले होते. त्यासाठी ती जमीन देण्यास तयार झाली. परंतु नंतर पंचायतीने निर्णय घेतला की रस्त्याची रुंदी 24 फूट असेल तर अशा परिस्थितीत त्यांची अधिक जमीन गमावली जाईल. ज्याचा त्यांनी विरोध केला. परंतु शुक्रवारी रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा महिलांनी विरोध दर्शविला. ज्यावर लोक जमा झाले आणि त्यांनी त्याला मारहाण केली.
“West Bengal: A school teacher in South Dinajpur was tied with a rope n beaten TMC leader, after she protested against their bid to acquire her land forcibly. When she went to Police, police filed complained against her only”
Maa ko Maati mei mila diya Amanush @mamataoffical ne!! pic.twitter.com/JEkDe1iQgv
— Shash (@pokershash) February 3, 2020
इतर बातम्या - हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर ऐकेरी भाषेत टीका
दोन्ही महिलांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. आपल्या बहिणीवरील हल्ल्याला विरोध करणार्या वडील बहिण सोमा दास यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. स्मृतीकोना दास यांना उपचारानंतर शनिवारी सुट्टी देण्यात आली.
स्मृतीकोना यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. यात त्यांनी हल्ला करण्याचे निर्देश दिलेले ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमल सरकार यांचे नाव दिले आहे. स्मृतीकोना गावाजवळ हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. ती आपल्या आईबरोबर राहते. त्याची आई मुलीला वाचवण्यासाठी आली तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
इतर बातम्या - शाहीन बाग, जामिया विद्यापीठ गोळीबार DCPला भोवला, निवडणूक आयोगाने केली हकालपट्टी