सगळ्यांच्या पोटासाठी झटली पण कोरोनानं नेलं मृत्यूच्या दारात, शिक्षिकेचा धक्कादायक अंत

सगळ्यांच्या पोटासाठी झटली पण कोरोनानं नेलं मृत्यूच्या दारात, शिक्षिकेचा धक्कादायक अंत

गरजूंना रेशन देण्यासाठी ही महिला शिक्षिका सध्या ड्युटीवर होती. पण कोरोना झाल्यामुळे आयुष्याशी लढा संपला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : संपूर्ण जगभरात सध्या कोरोना महामारीचं संकट आहे. या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाने अनेकांचे जीव घेतले तर अनेक जण अद्यापही या रोगाची झुंज देत आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांची घरचं उद्ध्वस्त झाली. यातच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाव्हायरस (COVID-19) मुळे शाळेतील एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

गरजूंना रेशन देण्यासाठी ही महिला शिक्षिका सध्या ड्युटीवर होती. उत्तर दिल्ली महानगरपालिका (NDMC) यांनी रविवारी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळ्यांवर शोककळा पसरली आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी, रविवारी ही बातमी आली की दिल्लीत कोरोना संसर्गाची आणखी 381 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पाच लोकांचा यात मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच राज्याचं वीजजोडणी धोरण जाहीर होणार

कोरोना इन्फेक्शनच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. यासह, दिल्लीमध्ये संक्रमित होण्याची एकूण संख्या 6,923 वर गेली आहे. दिल्लीत सरकारने सांगितलेल्या कोरोना विषाणू रुग्णांची संख्या आणि रुग्णालयांनी दिलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा फरक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

मजुरांच्या मृत्यूचं सत्र थांबेना, उष्णतेमुळे 3 जणांनी वाटेतच गमावला जीव

या प्रकरणात आम आदमी पार्टी (आप) सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, कोरोनाव्हायरसबद्दल काहीही लपवण्याचं कारण नाही. आणि राष्ट्रीय राजधानीत अशी एकही घटना नाही जी आकड्यांमध्ये मोजली गेली नाही. आकडेवारीबाबत संभ्रम आहे कारण दिल्ली सरकारने मृतांची संख्या 68 अशी जाहीर केली आहे, चार रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या 92वर पोचली आहे.

'कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारून म्हणाली...', शोएब अख्तरचा VIDEO VIRAL

संपादन - रेणुका धायबर

First published: May 10, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading