कित्येक वर्ष नजरकैदेत होती सावत्र मुलगी, वडिलांच्या 8 मुलांना दिला जन्म

कित्येक वर्ष नजरकैदेत होती सावत्र मुलगी, वडिलांच्या 8 मुलांना दिला जन्म

सावत्र मुलीला बंदी करत पित्यानेच तिच्यावर अत्याचार केलं. सगळ्यात गंभीर म्हणजे पीडित मुलीने पित्याच्या 8 मुलांना जन्म दिला आहे.

  • Share this:

अमेरिका, 20 नोव्हेंबर : बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावत्र मुलीला बंदी करत पित्यानेच तिच्यावर अत्याचार केलं. सगळ्यात गंभीर म्हणजे पीडित मुलीने पित्याच्या 8 मुलांना जन्म दिला आहे. पीडित मुलगी जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तीचं अपहरण केलं आणि अनेक वर्ष तिला कैद करून ठेवलं. गेली कित्येक वर्ष वडिलांनी पीडितेवर जबरदस्ती केली आणि तिने 8 मुलांना जन्म दिला.

एकदा असंच धाडस करून पीडिता वडिलांच्या तावडीतून पळाली आणि स्वत:ची नराधम पित्यापासून सुटका करून घेतली. दरम्यान, पळून गेल्याच्या तब्बल 3 वर्षानंतर पीडितेने या प्रकाराबद्दस पोलिसांना माहिती दिली आहे. Dr. Oz Show या अमेरिकेच्या टीव्ही शोमध्ये पीडितेने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. माध्यमांमध्ये ही बातमी व्हायरल झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेची आईला त्रास देण्याच्या हेतूने सावत्र पित्याने 1997मध्ये तीचं अपहरण केलं. अमेरिकेच्या ओकलाहोमामध्ये राहणाऱ्या पीडितेचं अपहरण करून आरोपी पिता तिला मेक्सिकोला घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला नजरकैदेत ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार केले.

मेक्सिकोमध्ये गेल्यानंतर पित्याने लेकीसोबत लग्नही केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर पित्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले आणि आतापर्यंत 8 मुलांना जन्म दिला आहे. गेली अनेक वर्ष आरोपी पित्याने पीडितेला एका झोपडीत बंज करून ठेवण्यात आलं होतं.

2016मध्ये पीडित तरुणी तिच्या मुलांना घेऊन पळून गेली आणि अमेरिकेच्या एम्बॅसीमध्ये पोहोचली. यावेळी काही अनोळखी लोकांनी तिची मदत केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. तिथल्या स्थानिकांच्या मदतीने पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आरोपी पित्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. कोर्टाने आरोपी पित्याविरोधात दोषी करार दाखल केला आहे. पण त्यावर अद्याप कोर्टाकडून निर्णय देण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, असंच एक प्रकरण ऑस्ट्रियामध्येदेखील समोर आलं होतं. जिथे एक पित्याने त्याच्याच मुलीला कैद करून ठेवलं होतं. 24 वर्षांनंतर पीडित मुलीने तब्बल 7 मुलांना जन्म दिला होता.

First published: November 20, 2019, 7:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading