Home /News /news /

सिगरेटचा धूर तोंडावर सोडून महिलेला लुटलं; दीड तोळ्याचे दागिने घेऊन भामटे फरार

सिगरेटचा धूर तोंडावर सोडून महिलेला लुटलं; दीड तोळ्याचे दागिने घेऊन भामटे फरार

Crime in Beed: आरोपींनी सिगरेटचा धूर (cigarette smoke) महिलेच्या तोंडावर सोडून 11 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले आहेत.

    परळी, 28 जुलै: आठवडी बाजारात खरेदी करून घराकडे परतणाऱ्या एका महिलेचे 11 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याची (11 Gram ornaments theft) धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी सिगरेटचा धूर (cigarette smoke) महिलेच्या तोंडावर सोडून तिची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करत आहेत. सुनिता नवनाथ गित्ते असं फसवणूक झालेल्या 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. फिर्यादी महिला बीड (Beed) जिल्ह्याच्या परळीतील (Parali) वड सावित्रीनगर परिसरातील रहिवासी आहेत. सोमवारी 26 जुलै रोजी फिर्यादी सुनिता गिते या आठवडी बाजारासाठी परळी याठिकाणी आल्या होत्या. बाजारात खरेदी केल्यानंतर गित्ते पुन्हा आपल्या घराकडे जात होत्या. दरम्यान रस्त्यावर त्यांना सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूची दोन बिस्किटे दिसली. हेही वाचा-अश्लील शेरेबाजी करत वृद्धानं गावाला आणला वैताग; तरुणानं आयुष्यभराची घडवली अद्दल फिर्यादीनं त्यातील एक बिस्किट उचलून घेतलं. ते बिस्किट सोन्याचं असावं असं त्यांना वाटलं. पण त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अन्य एका अनोखळी युवकानं दुसरं सोन्याचं बिस्किट उचलून घेतलं आणि फिर्यादी महिलेचा पाठलाग सुरू केला. महिला परळीतील आयसीआयसीआय रस्त्यावर आली असता, आरोपीनं त्यांना गाठलं. तसेच त्यांना थांबवून म्हणाला की, 'माझं सोन्याचं बिस्किट खाली पडलं होतं. त्यातील एक बिस्किट तुम्ही उचललं आहे. तुम्ही मला माझं बिस्किट परत द्या.' हेही वाचा-आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना महिलेशी बोलत असताना, संबंधित अनोळखी व्यक्तीनं सिगरेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडला. यामुळे फिर्यादीस कसल्यातरी प्रकारची गुंगी आली. गुंगी आल्यानं फिर्यादी महिलेनं आपल्या अंगावरील 56 हजार 661 रुपये किमतीचे 11 ग्रॅम सोनं अज्ञात आरोपीला काढून दिलं. यानंतर आरोपी हे दागिने घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Theft

    पुढील बातम्या