मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेला दिसला नग्न तरुणीचा मृतदेह; सत्य समोर येताच शरमली

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेला दिसला नग्न तरुणीचा मृतदेह; सत्य समोर येताच शरमली

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच एक मृतदेह असल्याचं त्यांना दिसलं. दोघंही भरपूर घाबरले.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच एक मृतदेह असल्याचं त्यांना दिसलं. दोघंही भरपूर घाबरले.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच एक मृतदेह असल्याचं त्यांना दिसलं. दोघंही भरपूर घाबरले.

नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : अनेकदा तुमच्यासमोर वेगळीच काहीतरी वस्तू असते मात्र तुमचा गैरसमज होतो आणि तुम्ही याला भलतंच काहीतरी समजता. ही अगदीच सामान्य बाब आहे. नुकतंच इंग्लंडमधील (England) महिलेसोबतही असंच काहीसं घडलं. तिनं ही घटना सोशल मीडियावर (Social Media) शेअर करताच नेटकरीही हैराण झाले. अनेकांना ही घटना विनोदी (Funny Incident) वाटली तर अनेकांना विचित्र.

लग्नातच तरुणीनं नवरदेवाच्या मित्रासोबत ठेवले संबंध; अचानक आला हृदयविकाराचा झटका

२६ वर्षाची कारा लेवी ही मूळची कॅलिफोर्नियाची आहे. मात्र, इंग्लंडच्या अॅसेक्समध्ये राहते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर एक अजब किस्सा शेअर केला, जो चांगलाच व्हायरल होत आहे. डेली स्टार या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, कारा आपला बॉयफ्रेंड क्रिस हॉबसन सोबत ४ ऑक्टोबर रोजी घरातील कचरा फेकण्यासाठी हॅरलो रिसायकलिंग सेंटर इथे जात होती. सकाळचे सुमारे दहा वाजले होते. कपल कचरा (Garbage) फेकण्यासाठी त्याठिकाणी पोहोचलं तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच एक मृतदेह असल्याचं त्यांना दिसलं. दोघंही भरपूर घाबरले. मात्र, हिंमत करून जेव्हा ते याच्याजवळ गेले तेव्हा त्यांना समजलं की हा मृतदेह नसून सेक्स डॉल (Sex Doll) आहे. कारानं सांगितलं, की ही डॉल जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिली तेव्हा ती इतकी खरी वाटली की कोणालाही संशय आला असता, की हा मृतदेहच आहे. काराला क्राईम शो फार आवडतात, त्यामुळे सुरुवातीला तिनं मृतदेहाच्या नजरेनंच याकडे पाहिलं. मात्र, तिथे सेक्स डॉल असल्याचं समजताच ती शरमली. कारा आणि तिचा बॉयफ्रेंड एकमेकांकडे पाहून हसू लागले.

मुलीनं बनवला अंघोळ करणाऱ्या आईचा लाईव्ह व्हिडिओ;मोबाईल पाहताच महिलेला बसला धक्का

कारानं सांगितलं, की या डॉलच्या डोक्याला विग लावलं गेलं होतं आणि तिला एक बोल्ड टॉप घातला गेला होता. त्यामुळे, पहिल्या नजरेत ही डॉल एखाद्या न्यूड महिलेच्या मृतदेहाप्रमाणे दिसत होती. कारानं म्हटलं, की हा कोणीतरी वेडाच असेल जो ही डॉल पॅक न करताच कचऱ्याच्यात टाकून गेला. कारानं इन्स्टाग्रामवर या डॉलचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली.

First published:

Tags: Viral news