Home /News /news /

कॅन्सर झाल्याचं खोटं सांगत डोनेशनमधून मिळवले 81 लाख रुपये, अखेर 7 वर्षांनी महिलेचं बिंग फुटलं

कॅन्सर झाल्याचं खोटं सांगत डोनेशनमधून मिळवले 81 लाख रुपये, अखेर 7 वर्षांनी महिलेचं बिंग फुटलं

अमांडा क्रिस्टीन रिले (Amanda Christine Riley) नावाच्या महिलेनं तिला कॅन्सर झाल्याचं सांगून लोकांकडून सात वर्षांपर्यंत डोनेशन मिळवलं. त्यानंतर जे सत्य समोर आले ते धक्कादायक आहे.

कॅलिफोर्निया, 05 मे: कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार होईल, असं कुणाला कधी स्वप्नातही असं वाटणार नाही. हा आजार माणसाला केवळ मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही उद्ध्वस्त करतो. कॅन्सरच्या उपचारांसाठी खूप मोठा खर्च येतो. अनेक जणांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यांना कॅन्सरसाठी लागणारा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे लोक पब्लिक डोनेशनची (Public Donation for cancer) मदत घेतात. पब्लिक डोनेशनमधून येणारा पैसा परत करावा लागत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची बरीच मदत होते. दरम्यान अमेरिकेतील एका महिलेनं खोटं बोलून पब्लिक डोनेशनमधून पैसे मिळवल्याची बाब समोर आली आहे. अमांडा क्रिस्टीन रिले (Amanda Christine Riley) नावाच्या महिलेनं तिला कॅन्सर (Woman faked her cancer) झाल्याचं सांगून लोकांकडून सात वर्षांपर्यंत डोनेशन मिळवलं. त्यानंतर जे सत्य समोर आले ते धक्कादायक आहे. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या अमांडा क्रिस्टीन रिले नावाच्या महिलेनं तिला हॉजकिन्स लिम्फोमा (Hodgkin’s lymphoma) असल्याचं सांगितलं. 2012 मध्ये या 37 वर्षीय महिलेने स्वतःला कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं. तसेच हॉजकिन्स लिम्फोमा हा कर्करोगाचा धोकादायक प्रकार असल्याचा दावा केला होता. त्याच्या उपचाराच्या खर्चासाठी तिने ऑनलाइन डोनेशनही मागायला सुरुवात केली. यादरम्यान लोकांनी त्या महिलेला सहानुभूती दाखवत तिला आर्थिक मदत केली. हे वाचा-महिला गोल्फर खेळाडूचं मासिक पाळीबद्दल बोल्ड भाष्य; पत्रकाराची बोलती झाली बंद डोनेशनमध्ये 81 लाखांची देणगी जमा झाली कॅलिफोर्नियातील सॅन जॉस इथं राहणार्‍या अमांडाने तिच्या खोट्या आजारपणाबद्दल लोकांना शंका येऊ नये म्हणून Lymphoma Can Suck It नावाचा ब्लॉग सुरू केला. इथे ती तिचे मुंडण असलेले फोटो आणि कॅन्सर स्ट्रगलच्या कथा लोकांना सांगायची. त्यामुळे या महिलेला तिच्या संघर्षात मदत करण्यासाठी लोकांनी तिच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. 7 वर्षात एकूण 105,513 डॉलर्स म्हणजेच तब्बल 81 लाख 20 हजार रुपयांहून अधिक रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. ही महिला कॅन्सरबद्दल तिच्या कुटुंबीयांशीही खोटं बोलली होती. हे वाचा-66व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले अरुण लाल, पत्नी 28 वर्ष लहान, लग्नाचे Unseen Photos पोलिसांनी केला भांडाफोड महिलेची ही फ्रॉड स्कीम इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसने 2019 मध्ये शोधून काढली होती. त्यानंतर महिलेवर वायर फ्रॉडचा आरोप लावण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. तिने बनावट कॅन्सरच्या नावावर जमा केलेली सर्व रक्कम परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तुरुंगातून सुटल्यानंतरही ती तीन वर्षे पोलिसांच्या देखरेखीखाली राहणार आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांनी तिच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, त्यापैकी बहुतेक लोक तिचे कुटुंबीय, मित्र आणि चर्चमधील होते. याशिवाय काही निधी उभारणाऱ्यांमार्फतही तिला पैसे मिळाले होते. अशाप्रकारे तब्बल सात वर्ष ही महिला फ्रॉड करत राहिली आणि पैसे मिळवत राहिली.
First published:

Tags: Cancer

पुढील बातम्या