ही महिला दिवसाला खाते 200 ग्राम बेबी पावडर, 15 वर्षात पावडरसाठी खर्च केले...!

ही महिला दिवसाला खाते 200 ग्राम बेबी पावडर, 15 वर्षात पावडरसाठी खर्च केले...!

मुलांना आंघोळ करुन जेव्हा ती पावडर लावायची तेव्हा तिला पावडरचा सुगंध आवडला आणि नंतर त्याची चवही आवडली. त्यानंतर आता बेबी पावडर लिसाचं व्यसन बनलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जानेवारी : बर्‍याच वेळा लोकांना विचित्र गोष्टी खाण्याची सवय लागते. उदाहरणार्थ, लहान मुलांना माती खायला आवडते, शाळेतील मुले खडू खाण्याची सवय लावतात. असेच एक भन्नाट व्यसन 44 वर्षीय लिसा अँडरसनला लागलं आहे. 15 वर्षांपासून लिसाला बेबी पावडर खाण्याची सवय लागली आहे. लिसा पाच मुलांची आई आहे. मुलांना आंघोळ करुन जेव्हा ती पावडर लावायची तेव्हा तिला पावडरचा सुगंध आवडला आणि नंतर त्याची चवही आवडली. त्यानंतर आता बेबी पावडर लिसाचं व्यसन बनलं आहे.

लीसाने फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 'पावडर कायम घरी असायची. मी अंघोळ झाल्यानंतर रोज अंगाला पावडर लावायचे. त्यानंतर मुलांना अघोळ घातल्यानंतरही ती त्यांना पावडर लावायची. हळू-हळू लिसाला पावडर खाण्याची सवय लागली. त्यानंतर आता तिला प्रत्येक अर्धा तासाला मला पावडर खायला आवडते'

लिसाचा असा दावा आहे की, ती दररोज किमान 200 ग्रॅम पावडर खाते. तिला अर्ध्या तासाने पावडर खाण्याची भूक लागते. अगदी ती रात्री चार वेळा पावडर खायला उठते. ती म्हणते की, "मी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पावडरशिवाय राहू शकत नाही."

इतर बातम्या - नागपूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', त्याने आधी एकाला संपवलं मग गँगने घेतला बदला

डेली मेलच्या म्हणण्यानुसार, गेल्या 15 वर्षात त्याने पावडरवर 7.5 लाख रुपये खर्च केले आहेत. सुरुवातीला लिसा लपून पावडर खायची, परंतु 10 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याने तिला पावडर खाताना पाहिले. यानंतर तिच्या नवऱ्याने तिला डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला.

लिसा म्हणाली, "बर्‍याच वर्षांपासून मला माहित नव्हते की माझे काय चालले आहे." डॉक्टरांचा असा विश्वास आहे की लिसा PICA पीडित आहे, म्हणजेच खाण्याच्या विकाराने ग्रस्त आहे.

इतर बातम्या - Nandurbar ZP Election: भाजपने रोखला काँग्रेसचा रथ, सत्तेची चावी शिवसेनेकडे!

First published: January 8, 2020, 5:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading