मेट्रोमध्ये तरुणीने केलं फोटोशूट, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

मेट्रोमध्ये सगळ्यांच्या समोर या तरुणीने फोटोशूट केलं. यावेळी तिच्यात दमदार आत्मविश्वासा होता. याचचं कौतुक सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 10:08 PM IST

मेट्रोमध्ये तरुणीने केलं फोटोशूट, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

न्यूयॉर्क, 22 ऑगस्ट : न्यूयॉर्कच्या मेट्रोमध्ये एका महिलेने सेल्फी शूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये सगळ्यांच्या समोर या तरुणीने फोटोशूट केलं. यावेळी तिच्यात दमदार आत्मविश्वासा होता. याचचं कौतुक सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी केलं आहे.

लेखक बेन याहरने गेल्या आठवड्याच्या शेवटी एक व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यामध्ये त्याने एक महिला काळ्या ड्रेसमध्ये आहे. जी तिच्या फोन कॅमेर्‍यावरून फोटो शूट करत होती. आपल्या चेहऱ्याचा ग्लॅमर शॉट मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्टाईलने तरुणी फोटो काढत होती. त्यात ती तिच्या पर्सवर फोन ठेवून टायमर सेट करून फोटो क्लिक करत असल्याचं दिसतं.

या तरुणीचं नाव जेसिका असं सांगितलं जात आहे. मेट्रोमधील इतर प्रवाशांच्या उपस्थितीत तिने फोटोशूट केलं. कोण काय विचार करेल किंवा काय बोलेल याची तिने जराही पर्वा केली नाही. लोकांनी जेसिकाच्या या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे.

या 57 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेसचा आत्मविश्वास अजिबात डगमगलेला नाही. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करण्यात आला आहे.

जेसिकाने मानले सर्वांचे आभार

व्हिडिवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर जेसिकाने आभार मानले आहेत. जेसिकाने ट्विटरवर लिहिलं की, 'प्रत्येकाने व्यक्त केलेल्या शब्दांनी मी भारावून गेले आहे आणि मला तुमच्या सर्वांचे अभिनंदन मानायचे आहेत! ही सकारात्मकता सगळीकडे पसरवा आणि इतरांनाही पुढे जाण्यासाठी मदत करा. '

बेन याहर यांनी ट्विटरवर व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर जेसिकाने आपले फोटोशूटचे काही फोटो पोस्ट करत 'धन्यवाद सर' असं लिहलं आहे.

ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...