CCTV VIDEO : महिला डॉक्टरची आत्महत्या; 8व्या मजल्यावरून मारली उडी

घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता खडकपाडा पोलिसांनी वर्तवलीय.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 08:58 PM IST

CCTV VIDEO : महिला डॉक्टरची आत्महत्या; 8व्या मजल्यावरून मारली उडी

कल्याण, 27 नोव्हेंबर : महिला डॉक्टरने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये मंगळवारी घडली. या घटनेत महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. प्राजक्ता कुलकर्णी असं या मृत महिला डॉक्टरचं नाव आहे. घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.


प्राजक्ता कुलकर्णी यांचे पती प्रणव कुलकर्णी हे देखील डॉक्टर आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू खडकपाडा परिसरातील 'महावीर हाईट्स' या इमारतीत हे दाम्पत्य दोन मुलं आणि सासू-सासऱ्यासह राहत होतं. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास प्राजक्ता कुलकर्णी या त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून आठव्या मजल्यावर गेल्या आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी न्यूज18 लोकमतला दिली.


घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून, इमारतीमधील कुणीही काहीही बोलायला तयार नसल्याचं बाळासाहेब कदम यांनी सांगितलं.

Loading...


LIVE VIDEO : दिवसाढवळ्या लुटली दागिन्यांची शोरूम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...