मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पतीनं डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, मेट्रोच्या मिक्सर कारची धडक बसली अन्...

पतीनं डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, मेट्रोच्या मिक्सर कारची धडक बसली अन्...

डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जाताना पाहिल्याने मिथिलेशला मोठा धक्का बसला आहे.

डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जाताना पाहिल्याने मिथिलेशला मोठा धक्का बसला आहे.

डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जाताना पाहिल्याने मिथिलेशला मोठा धक्का बसला आहे.

    कानपूर, 16 मार्च : रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक अपघात झालेले आपण पाहिले असाच एक अपघात मेट्रोच्या कामामुळे झाला आहे. मेट्रोच्या कामासाठी आणलेल्या मिक्सरमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरच्या दलहन क्रॉसिंगजवळ मेट्रोच्या मिक्सरमध्ये दुचाकी चालवणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पतीसह दुचाकीवरून निघालेली महिला मिक्सरच्या धडकेत रस्त्यावर पडली आणि ती जागीच ठार झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. घटनेनंतर चालक मिक्सर कारसह घटनास्थळावरून पळून गेला. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करत आहे. पनकी शताब्दी नगर इथं राहणारा मिथिलेश त्रिवेदी सोमवारी पत्नी मनोरमासमवेत रावतपूरला जात होता. तो नुकताच दलहन ओलांडण्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्याच्या दुचाकीने मिक्सर मशीनमध्ये दुचाकीला धडक दिली. धडक लागल्यामुळे दुचाकीवर बसलेली त्याची पत्नी मनोरमा जोरात उडाली आणि रस्यावर पडली. यामध्ये मनोरमाचा जागीच मृत्यू झाला. हे वाचा - कोल्हापूरच्या रुग्णाचा खरंच कोरोनामुळे झाला मृत्यू, वाचा काय आहे सत्य? या अपघातामुळे जीटी रोडवर मोठी कोंडी झाली होती. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेऊन तो शवविच्छेजनासाठी पाठवला. अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती कल्याणपूर निरीक्षकांनी दिली आहे. पोलीस दलाने जीटी रोडवरील जाम हटवला असून आता पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जाताना पाहिल्याने मिथिलेशला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती त्रिवेदी कुटुंबियांना देण्यात आली आहे. तर पळून गेलेल्या चालकाला ताब्यात घेऊन त्याला कठोर शिक्षा द्या अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. हे वाचा - धक्कादायक! न्यायालयाच्या शौचालयात आढळला लिपिकाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या