ठाणे स्थानकात विशेष ठरली शनिवारची संध्याकाळ, महिलेने दिला बाळाला जन्म

इशरत शेख या अंबिवली ते कुर्ला असा रेल्वेनं प्रवास करत होत्या. त्यांना अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यानंतर रेल्वे पोलीस देवासारखे धावून आले.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:50 AM IST

ठाणे स्थानकात विशेष ठरली शनिवारची संध्याकाळ, महिलेने दिला बाळाला जन्म

ठाणे, 07 एप्रिल : ठाणे रेल्वे स्थानकात शनिवारची संध्याकाळ अगदी विशेष गेली. कारण रेल्वे स्थानकात एका महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रेल्वेतून प्रवास करताना अचानक प्रसुती कळा सुरू झाल्याने ठाण्याच्या रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसुती करण्यात आली आहे. महिलेने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.

इशरत शेख या अंबिवली ते कुर्ला असा रेल्वेनं प्रवास करत होत्या. त्यांना अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यानंतर रेल्वे पोलीस देवासारखे धावून आले. रेल्वे सुरक्षा पथकातील महिलांनी गर्भवती इशरत यांना तात्काळ रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या 'one rupee clinic' इथे नेण्यात आलं आणि तिथेच त्यांची प्रसुती केली. संध्याकाळी 6:30च्या सुमारात इशरत यांनी मुलाला जन्म दिला. त्यामुळे यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानकात एक वेगळात आनंद होता.
यानंतर याची माहिती इशरत यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांनी इशरत यांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. तर बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

इशरत यांनी ठाणे रेल्वे सुरक्षा पथकाचे आभार मानले आहेत. तर प्रत्येक रेल्वे स्थानकात 'one rupee clinic'ची सोय केल्यामुळे त्यांनी त्याबद्दलही आभार मानले आहेत.


मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...