लंडन, 04 जानेवारी : एका 28 वर्षीय महिलेने असं उघड केलं आहे की, डॉक्टरांनी तिला कर्करोगाबद्दल खोटे सांगून शस्त्रक्रियेनंतर तिचे दोन्ही स्तन काढून टाकले. डॉक्टरांनी 2 मुलांच्या आईला कर्करोगाचा झाला असल्याची भीती दाखवली आणि तिला केमोथेरपीची इंजेक्शन्सही दिले. या आजारावर शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेचे दोन्ही स्तन काढल्याचं सांगण्यात येत आहे.
इंग्लंडच्या स्टाफ्स नावाच्या ठिकाणी राहणारी महिला सारा बोयले म्हणाली की, काही वर्षांपूर्वी तिला ट्रिपल निगेटिव्ह कर्करोग असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी 25-वर्षीय महिलेला केमोथेरपीच्या अनेक राऊंड करायला सांगतले. सारा म्हणाली की, बराच वेळ निघून गेल्यानंतर तिला याबद्दल बोलण्यास त्रास होत होता.
केमोथेरपीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, हा आजार पसरू नये यासाठी दोन्ही स्तन काढून टाकावे लागतील. परंतु नंतर रॉयल स्ट्रोक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या चाचणीचा गैरसमज झाला आणि त्यांच्यावर चुकीचे उपचार केले गेले.
इतर बातम्या - कुशल पंजाबीच्या आत्महत्येवर दीपिकाची प्रतिक्रिया, म्हणाली...
परंतु सारासाठी सर्वात वेदनादायक बाब म्हणजे तिला असं सांगितलं गेलं की, जर तिचे स्तन परत मिळवण्यासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्यास ती कर्करोगाचा धोका उद्भवू शकते. त्यामुळे आता ती यावर काही उपचार करू शकणार नाही.
साराने सांगितले की, सुरुवातीला तिला असेही सांगितले गेले होते की कर्करोगाच्या उपचारामुळे तिच्या प्रजननावर परिणाम होऊ शकतो, परंतु तिने दुसर्या मुलाला जन्म दिला. आता सारा रुग्णालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची वकिली करीत आहे जेणेकरुन इतर महिलांना अशा प्रकारच्या समस्यांमधून जाऊ नये.
इतर बातम्या - मी सरकारच्या कामावर नाराज, सेनेच्या आमदाराचा घरचा अहेर
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.