Home /News /news /

हा VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल कोरोनाचा प्रकोप होणार, हजारो लोकांनी काढली बाप्पाची मिरवणूक आणि....

हा VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल कोरोनाचा प्रकोप होणार, हजारो लोकांनी काढली बाप्पाची मिरवणूक आणि....

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात विसर्जन मिरवणुकीवर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.

बेळगाव, 03 सप्टेंबर : राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. रोज नव्याने कोरोनाचे रुग्ण समोर येत असताना राज्यातला सगळ्यात मोठा उत्सव गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पण बेळगावमध्ये मात्र, लॉकडाऊनच्या नियमांना फाटा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात विसर्जन मिरवणुकीवर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे. बेळगाव शहरातील ही धक्कादायक घटना आहे. हजारो गणेशभक्त एकत्र येत विना मास्क बाप्पाची मिरवणूक काढली. या घटनेचा व्हिडिओ पाहून काळजात धडकी भरते. हजारो लोक विना मास्क घालत एकत्र आले आणि डान्स सुरू होता. या घटनेमुळे आता कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकरने मागितले चक्क बिटकॉइन घटनेची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा प्रशासन कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून गणेशभक्तांचा डान्स आता महागात पडणार आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हजारो लोक या मिरवणूकीसाठी होते. त्यामुळे संसर्गाचा धोका तर आहेच पण या सगळ्यांना शोधणं हे पोलिसांच्या समोर मोठं आवाहन आहे. एकीकडे अशा प्रकारे लोक निष्काळजीपणे वागत आहेत तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी नव्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 17 हजार 433 जणांची भर पडली. तर 13 हजार 959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 493 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 01 हजार 703 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये पहिली पिकनिक ठरली अखेरची, मेळघाटात 3 तरुणांचा जागीच मृत्यू बुधवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 42 लाख 84 हजार नमुन्यांपैकी ८8 लाख 25 हजार 739 नमुने पॉझिटिव्ह (19.27 टक्के) आले आहेत. राज्यात 14 लाख 04 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 785 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 292 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या covid संकट सगळीकडेच वाढत आहे अशा काळात खाजगी शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड देखील मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक स्वतःच्या आर्थिक ताकदीवर गरज नसताना ICU बेड घेत असल्याचं धक्कादायक वास्तव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या