प्रियकरासाठी पतीचा मृतदेह नदीत फेकला, 4 दिवसांनी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार

प्रियकरासाठी पतीचा मृतदेह नदीत फेकला, 4 दिवसांनी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नी रेणूने हत्या केल्यानंतर अरुण यांचा मृतदेह गोमती नदीमध्ये फेकून दिला. पतीच्या हत्येबद्दल कोणाला समजून नये यासाठी 4 दिवसांनी पती बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली.

  • Share this:

जैदपूर, 06 एप्रिल : पत्नीने प्रियकरासोबत पतीची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेणू असं आरोपी पत्नीचं नाव आहे तर अरुण वर्मा असं तिच्या पत्नीचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नी रेणूने हत्या केल्यानंतर अरुण यांचा मृतदेह गोमती नदीमध्ये फेकून दिला. पतीच्या हत्येबद्दल कोणाला समजून नये यासाठी 4 दिवसांनी पती बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली.

पण, घाबरलेल्या रेणूवर पोलिसांना संशय आला आणि तिची कसून चौकशी केली. यावेळी प्रियकर आणि त्याच्या मित्राने सर्व सत्य पोलिसांसमोर सांगितलं. यामध्ये पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

यानंतर पोलिसांनी नदीतून पतीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रेणू आणि तिच्या प्रियकराने अरुणला दारू पाजून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोमती नदीमध्ये फेकून दिला असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

VIDEO: दादरच्या शोभायात्रेत आर्चिची मराठमोळी एन्ट्री; चाहतेही सैराट

First published: April 6, 2019, 10:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading