Elec-widget

VIDEO : भारत - पाक सामन्याच्या जाहिरातीत विंग कमांडर अभिनंदनची हेटाळणी

VIDEO : भारत - पाक सामन्याच्या जाहिरातीत विंग कमांडर अभिनंदनची हेटाळणी

पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्तमानने निडरपणे पाकिस्तानी लष्कराच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. त्याबदद्ल त्याचं देशभरामध्ये कौतुक झालं. पण आता मात्र पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्तमानची नक्कल आणि हेटाळणी करणारी एक जाहिरात दाखवली जाते आहे. ही जाहिरात भारत आणि पाकिस्तान यांच्या वर्ल्ड कपमधल्या सामन्याबद्दल आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्तमानने निडरपणे पाकिस्तानी लष्कराच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. त्याबदद्ल त्याचं देशभरामध्ये कौतुक झालं. पण आता मात्र पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्तमानची नक्कल आणि हेटाळणी करणारी एक जाहिरात दाखवली जाते आहे.

मॅच नव्हे युद्ध

भारत आणि पाकिस्तानमध्ये रविवारी क्रिकेटची मॅच आहे. या दोन देशांतला सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि त्यातही हा सामना वर्ल्ड कपमधला आहे. या दोन देशातला सामना युद्धापेक्षा कमी नसतो, असंच म्हटलं जातं. त्यामुळेच पाकिस्तानमध्येही याबदद्ल वातावरण तापत चाललं आहे.

पाकिस्तानमधल्या जॅझ टीव्हीवर सध्या एक जाहिरात सुरू आहे. यामध्ये एक मॉडेल अभिनंदनच्याच लूकमध्ये दाखवला आहे. अभिनंदनसारख्याच त्यालाही मिशा आहेत आणि त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंसारखी निळी जर्सी घातली आहे.


Loading...


विंग कमांडर अभिनंदन चहा पीत पीत पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना उत्तरं देतो, असा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये अभिनंदनला काही प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा तो इंग्रजीतून म्हणतो, 'माफ करा, मी याचं उत्तर देणं अपेक्षित नाही.'

पाकिस्तानी टीव्ही वरच्या जाहिरातीतही अभिनंदनसारखा दिसणारा हा मॉडेल अशाच पद्धतीने उत्तरं देतो. या जाहिरातीत त्याला भारत - पाकिस्तान सामना आणि सामन्याच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्यावर हा मॉडेलही चहाचा घोट घेत विंग कमांडर अभिनंदनसारखी उत्तरं देतो. विंग कमांडर अभिनंदनने न घाबरता प्रश्नांची उत्तरं दिली होती पण या जाहिरातीत मात्र हा मॉडेल घाबरल्याचा अभिनय करतो.

ही जाहिरात संपल्यानंतर अभिनंदनच्या चहाच्या कपाचा आधार घेत 'लेट्स ब्रिंग द कप' असंही या जाहिरातीत म्हटलं आहे.

संवेदनशील विषयाची थट्टा

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने उत्तर दिलं. यावेळी विंग कमांडर अभिनंदन मात्र पाकिस्तानच्या ताब्यात सापडला. दोन्ही देशांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील होता. पण अशा संवेदनशील विषयावर या जाहिरातीत हेटाळणी करण्यात आली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर टीका होते आहे.

पाकिस्तानने सदिच्छा दाखवत अभिनंदनला सोडून दिलं आणि हा शूर वैमानिक भारतात परतला. आता मात्र पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती दाखवल्या जाणार असतील तर त्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

=============================================================================================

बिग बॉसमधून मैथिली जावकरला कोणत्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...