बंगळूरू, 3 मार्च : विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रेमात सध्या सारा देश आकांत बुडालेला दिसत आहे. पाकिस्तानच्या कैदेत असताना देखील दाखवलेलं धैर्य आणि हिंम्मत पाहता देशाला त्यांचा अभिमान वाटला. वाघा बॉर्डरवरून विंग कमांडर भारतात आले, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो भारतीय वाघा बॉर्डरवर हजर होते. ढोल, ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं गेलं. देशवासियाचं प्रेम पाहून अभिनंदन देखील भारावून गेले.
विंग कमांडर अभिनंदन देशवासियांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. देशवासी त्यांना आपला आदर्श मानून लागले आहेत. इतकंच काय तर त्यांच्या प्रमाणे मिशी ठेवण्याकडे देखील आता तरूणांचा कल दिसून येतोय. बंगळूरूमधील एका तरूणानं त्यांच्यासारखी मिशी ठेवली असून अभिनंदन माझ्यासाठी रिअल हिरो असल्याची भावना त्यांनं बोलून दाखवली आहे. मोहम्मद चंद असं या तरूणाचं नाव आहे.
Wing Commander #AbhinandanVarthaman's moustache style getting popular. A Bengaluru local Mohammed Chand says,' I'm his fan, we follow him. I like his style. He is the real hero; I'm happy.' pic.twitter.com/cT7QGXntMs
पाकच्या विमानाचा पाठलाग करताना मिग - 21 क्रॅश झालं. त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानमध्ये उतले. त्याठिकाणी देखील त्यांनी जमावाला अत्यंत धौर्यानं तोंड दिलं. शिवाय, नकाशे नष्ट करण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली. पाकिस्तान सैन्यानं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर देखील नियमांप्रमाणे उत्तरे दिली. अखेर पाकिस्ताननं दबावापुढे झुकत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली केलं. त्यामुळे देशात आनंदाचं वातावरण आहे.
EXCLUSIVE VIDEO: रक्त गोठवणाऱ्या थंडीत करताहेत 'ते' देशाचं रक्षण