पंजाब, 01 फेब्रुवारी : गेल्या काहीदिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यासगळ्यात भारत-पाकिस्तान सीमेवर एक गुप्तहेराला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षादलाने एक गुप्तहेर ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेला पाकिस्तानी गुप्तहेर हा भारत आणि पाकिस्तान सीमेचे फोटो काढत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुप्तहेराकडून पाकिस्तानी सिम कार्ड आणि कॅमेरा ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचा मोबाईल नंबर हा पाकिस्तानी आबे म्हणजे 8 अंकी आहे. या गुप्तहेराकडे आणखी 6 अन्य पाकिस्तानी मोबाईलनंबर सापडले आहेत. ताब्यात घेतलेला हा आरोपी मुळचा उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्याकडील कॅमेऱ्याने बीसएसएफ पोस्टचे फोटो काढत होता. त्याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याची भारतीय सुरक्षादलांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
Punjab: BSF in Ferozepur has arrested an Indian national near border out post, Maboke&seized a mobile phone with Pakistani SIM card, in use, from his possession. The number is added to 8 Pak groups. 6 other Pak phone numbers also retrieved from him. The man is from Moradabad (UP)
— ANI (@ANI) March 1, 2019
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने सीआरपीएफचे 40 जवान गमावले. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
या हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ला केला. एलओसी पार करत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जैशच्या तब्बल 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, 4 जवान शहीद तर 8 जण जखमी
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये हंदवाडात बाबागुड लंगेट परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे तर या हल्ल्यात 8 जवान जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले होते. यामध्ये 2 दहशतवाद्यांचे 2 मृतदेह होते. भारतीय जवान तिथे पोहचताच एक दहशतवादी अचानक उठला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये गोळीबारामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या सुरक्षादलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली. भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चौख प्रत्युत्तर दिलं आहे.
शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सायंकाळी नौशेरा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या गेल्या आठ दिवसांपासून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असून दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.