मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

नागपूरातल्या विधानभवन परिसरात तुंबलेलं पाणी  बाहेर काढण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करत असतानाच मॅनहोल मध्ये बाटल्या सापडल्यानं सर्वानांच धक्का बसला.

नागपूरातल्या विधानभवन परिसरात तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करत असतानाच मॅनहोल मध्ये बाटल्या सापडल्यानं सर्वानांच धक्का बसला.

नागपूरातल्या विधानभवन परिसरात तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करत असतानाच मॅनहोल मध्ये बाटल्या सापडल्यानं सर्वानांच धक्का बसला.

नागपूर,ता.6 जुलै : सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आज नागपूरातलं जनजिवन विस्कळीत झालं. विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरातच सुरू असल्यानं सर्व मंत्रिमंडळ नागपूरातच आहे. या पावसाचा फटका विधिमंडळातल्या कामकाजालाही बसला. पावसाचा जोर जास्त असल्यानं विधान परिसरात पाणी तुंबल होतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करत असतानाच मॅनहोल मध्ये बाटल्या सापडल्यानं सर्वानांच धक्का बसला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे परिसराची पाहणी करत असतानाच मेनहॉलमधून बाटल्या निघाल्या, या बाटल्यांमुळंही पाणी तुंबण्याला मदतच झाली. विधानभवन परिसरात धुम्रपाणाला मनाई असताना आणि कडक सुरक्षा व्यवस्था असताना दारूच्या बाटल्या आल्याचं कशा असा प्रश्न निर्माण झालाय. तर या बाटल्या आणि दारू कुणाची असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

विधान भवनाचा परिसर अतिसुरक्षित समजला जातो. आतमध्ये प्रवेश करताना मध्ये येणाऱ्या प्रत्येक सामानाची कसून चौकशी केली जाते. कामाजादरम्यान मोठ्या प्रमाणावर कामगार काम करत असले तरी ते नेत असलेल्या सामानाचीही कसून चौकशी होते. अशी कडक सुरक्षा व्यवस्था असताना दारूच्या बाटल्या विधानभवनाच्या परिसरात सापडणं हे अतिशय धक्कादायक समजलं जातं. या प्रकरणाचा आता चौकशी होणार आहे. पण या बाटल्या नेमक्या कुणाच्या असा प्रश्न सर्वच आमदार विचारत आहेत.

दरम्यान, दारुच्या बाटल्या नाल्याच्या पाईपमध्ये अडकल्यानेच विधीमंडळात पाणी तुंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विधान भवनात मद्यपानास बंदी असताना इथं दारूच्या बाटल्या आल्याच कश्या, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा...

महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा

रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

फोटोंमागे होता फक्त भक्तिभाव, रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी

'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना

 

First published:

Tags: Nagpur assembly premises, Water logging, Wine bottles, तुंबणे, नागपूर, पाणी, विधानसभा