'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?'

'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?'

सुरक्षा व्यवस्था असताना या बाटल्या विधान भवन परिसरात आल्याचं कशा असा सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.

  • Share this:

नागपूर,ता.6 जुलै : नागपूरच्या विधान भवन परिसरात शुक्रवारी पाणी तुंबल. त्याच्या कारणांचा शोध घेताना परिसरातल्या नाल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. कडक सुरक्षा व्यवस्था असताना या बाटल्या विधान भवन परिसरात आल्याचं कशा असा सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलाय. या बाटल्या आणि दारूचा धनी कोण? बाटली कुणाची आणि दारू कुणाची हे भाजप आणि शिवसेनेने ठरवून घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावलाय.

रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

तर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी यावरून भाजपवर टीका केली. नैतिकतेचा आव आणणाऱ्या भाजपच्या काळात अशा बाटल्या परिसरात सापडतातच कशा? असा सवाल त्यांनी सरकारला केला. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ?

जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती

अशा सापडल्या बाटल्या

सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आज नागपूरातलं जनजिवन विस्कळीत झालं. विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरातच सुरू असल्यानं सर्व मंत्रिमंडळ नागपूरातच आहे. या पावसाचा फटका विधिमंडळातल्या कामकाजालाही बसला. पावसाचा जोर जास्त असल्यानं विधान परिसरात पाणी तुंबल होतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करत असतानाच मॅनहोल मध्ये बाटल्या सापडल्यानं सर्वानांच धक्का बसला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे परिसराची पाहणी करत असतानाच मेनहॉलमधून बाटल्या निघाल्या, या बाटल्यांमुळंही पाणी तुंबण्याला मदतच झाली. विधानभवन परिसरात धुम्रपाणाला मनाई असताना आणि कडक सुरक्षा व्यवस्था असताना दारूच्या बाटल्या आल्याचं कशा असा प्रश्न निर्माण झालाय. तर या बाटल्या आणि दारू कुणाची असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

 

 

First published: July 6, 2018, 5:50 PM IST

ताज्या बातम्या