मुंबई, 16 ऑगस्ट : 'कोरोनामुळे सुस्तावलेल्या आणि आळसावलेल्या दिल्लीचे दर्शन झाले. अमित शहांसह सहा-सात मंत्र्यांना कोरोनाने गाठलेच. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींची प्रकृती बरी नाही. अयोध्येतील नृत्यगोपाल दास यांना कोरोना झाला व मोदी त्यांच्या संपर्कात आले. त्यामुळे पंतप्रधान मोदी आता क्वारंटाइन होतील का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतले आहे.
'अयोध्येत रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. 85 वर्षांचे महंत नृत्यगोपाल दास हे 5 ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यास व्यासपीठावर हजर होते. त्यांनी तोंडास मास्क लावला नव्हता हे स्पष्ट दिसत होते. दुसरे असे की, त्याच वेळी पंतप्रधान मोदी व सरसंघचालक मोहन भागवत हे महंतांच्या संपर्कात आले. मोदी यांनी तर महंतांचा हात श्रद्धेने हातात घेतला. त्यामुळे महंतांना लागण झाल्याचे समजताच आपले पंतप्रधान मोदीही ‘क्वारंटाईन’ होणार काय? हा प्रश्न आहे' असा टोला राऊतांनी लगावला.
रत्नागिरीच्या समुद्रात थरारक घटना, लाटेपासून वाचण्यासाठी बोट फिरवली, पण...
'आमचे राजकारणी आजही अमेरिकेच्या प्रेमात पागल'
'भारतात कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत, राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत.
आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत.' असा टोला राऊतांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला.
'रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत' असंही राऊत म्हणाले.
पार्थ पवारांबद्दल चर्चा सुरू असतानाच अखेर अजित पवार बारामतीत
तसंच, 'आज गृहमंत्री अमित शहा कोरोनामुळे एकांतवासात, पंतप्रधान मोदी यांना नृत्यगोपाल दास भेटल्याची चिंता, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनाही कोरोना झाला व त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कॅबिनेटचे सदस्य, नोकरशहा, संसदेचा कर्मचारी वर्ग असे सगळेच जण दिल्लीत कोरोनाच्या विळख्यात आहेत. दंगली व लढायांतही दिल्ली इतक्या दहशतीखाली नव्हती. ती आज जरा जास्त भयग्रस्त आहे. मोदी व शहा यांची भीती होतीच, पण कोरोनाची भीती त्यांच्यापेक्षा जास्त आहे.' असंही राऊत म्हणाले.