नाशिक, 3 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोनाबाबत राज्यात आर्थिक अडचणी येत आहेत. याशिवाय केंद्राकडून अपेक्षित निधी येत नाही, त्यांनाही अडचणी आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थितीबरोबरच समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी संवाद साधला.
कोरोनाच्या काळात इतर विभागांवरही जास्त जबाबदारी होती, शेतीच्याही अडचणी होत्या. ऑक्टोबर महिन्यात मोठं नुकसान झालं, मात्र केंद्राच पथक डिसेंबरमध्ये आलं, टीम नाही आली त्यामुळे मदत नाही आली. याशिवाय भारत भालकेंच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती, अखेर अजित पवारांनी यावर उत्तर देऊन चर्चेला पूर्णविराम दिला.
अजित पवार आणखी काय म्हणाले....
- समृद्धी महामार्गच काम, मेट्रोच काम आम्ही सुरूच ठेवले आहे. आमच्यासाठी विकास महत्त्वाचा आहे.
- काल काही विभागात चार जिल्ह्यात लशीचा ड्राय रन घेण्यात आला. फक्त नंदुरबारमधील एका गावात अडचण आली
- काहींना राजकारण करायचं असल्याने ते म्हणतात की सरकार दुर्लक्ष करीत आहे.
- पार्थ पवारांबाबतची बातमी धादांत खोटी आहे. भालकेंच्या जागी पार्थ पवारांचं नाव नसेल. त्यामुळे हा विषय इथेच बंद करा
- 2021- 22 चा अर्थसंकल्प लवकरच जाहीर करणार
- जीएसटी संकलन केंद्राला जात आहे
- औरंगाबाद नामकरणाबाबत तिन्ही पक्षाचे नेते बसून मार्ग काढतील
- मविआ सरकार मध्ये फूट पडावी यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत
- गेल्या काही दिवसात जे प्रवासी येत आहेत त्यांना बर करूनच सोडलं जात आहे
- साहित्य संमेलनापूर्वी सुरक्षित वातावरण व्हावं
- सरकार कुणाचे ही असले तरी लस काही पक्षाची नाही. शेवटी हा माणसांच्या जीवाचा प्रश्न आहे. यामध्ये राजकारण आणू नये
- तुम्हाला वाटतंय तेच मला देखील ईडी कारवाई बाबत वाटतंय. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्याने कारवाई झाली पाहिजे
- मराठा आरक्षणाबाबत राज्य कमी कसं पडतंय ? फडणवीसांच्या काळातील वकिलांची टीम आहे.
- केंद्राची टीम राज्यात उशिरा आली. 2-2 महिने केंद्राची टीम येत नाही.
- मुख्यमंत्र्यानी तात्काळ 10 हजार कोटींचं पॅकज जाहीर केलं