...तर तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारा कायदा आणणार, केंद्राची कोर्टात भूमिका

...तर तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारा कायदा आणणार, केंद्राची कोर्टात भूमिका

"तिहेरी तलाकवर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली, तर तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवणारा आणि मुस्लिम समाजात विवाह आणि घटस्फोटांचं नियमन करणारा कायदा आणायला केंद्र सरकार तयार आहे"

  • Share this:

15 मे : तिहेरी तलाकवर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली, तर तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवणारा आणि मुस्लिम समाजात विवाह आणि घटस्फोटांचं नियमन करणारा कायदा आणायला केंद्र सरकार तयार आहे, अशी बाजू आज केंद्र सरकारने मांडली.

तिहेरी तलाक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तिहेरी तलाक म्हणजे मुस्लिम महिलांच्या समानतेच्या हक्काचा भंग आहे, असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगींनी केला. सुप्रीम कोर्टानं हे आधीच स्पष्ट केलंय की तूर्तास फक्त तिहेरी तलाकवर सुनावणी होईल. निकाह हलाला या कालबाह्य रिवाजावर चर्चा होणार नाही, तेवढा वेळ आपल्याकडे आता नाही, असं कोर्ट म्हणालं होतं.  सध्या तिहेरी तलाकबाबत केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात आपली भूमिका मांडत आहे.

First published: May 15, 2017, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading