मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकनाथ खडसे आज भेटणार आहे का? शरद पवारांनी केला खुलासा, VIDEO

एकनाथ खडसे आज भेटणार आहे का? शरद पवारांनी केला खुलासा, VIDEO

 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई, 07 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर खडसे आज मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे खडसे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार अशी चर्चा रंगली होती.

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल भाष्य केले.

'एकनाथ खडसे  यांची आज आपल्यासोबत भेट होणार असा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आले नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही', असा खुलासा शरद पवार यांनी केला.

दरम्यान, त्याआधी आज सकाळी एकनाथ खडसे हे मुंबईत दाखल झाले. 'आपण वैद्यकीय तपासणीसाठी आलो आहोत. दर महिन्यांना मी नियमित तपासणीसाठी येत असतो. त्यामुळे  मी कुणाची लपून छपून भेट घेणार नाही. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही', अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती.

राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, 'केवळ कळते समजते, यावर विश्वास ठेवू नका, जो काही निर्णय घ्यायचा आहे. त्याची घोषणा केली जाईल' असं त्यांनी स्पष्ट केले.

चेष्टा-मस्करीला काही मर्यादा असते! गुदद्वारात हवा भरल्यामुळे तरुणाचा मृत्यू

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.  रोशन भंगाळे नावाच्या समर्थकाने एकनाथ खडसे यांना निराश होऊन फोन केला होता. खडसे आणि भंगाळे नावाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला हा संवाद व्हायरल झाला.या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याबद्दल वक्तव्य केले होते. पण, नंतर ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचा दावा खडसेंनी केला होता.

मुळात एकनाथ खडसे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज आहे. वेळोवेळी त्यांची मनधरणी करण्यात आली.  बऱ्याच वेळा खडसेंनीच भाजप सोडणार असे संकेत दिले, नंतर भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर माघार घेतली. आताही भाजपच्या नव्या कार्यकरणीची घोषणा करण्यात आली.  पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना संधी देण्यात आली. यामध्येही एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

First published: