एटीएम वापरणे महागणार ?

एटीएम वापरणे महागणार ?

'कॉन्फेडरेशन ऑफ एटीए इंडस्ट्री'च्या (सीएटीएमआय) मते सध्या एटीएम उद्योग तोट्यात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जुलै : येत्या काही महिन्यांत एटीएम वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे. त्याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने एटीएमच्या अपग्रेडेशनबाबत दिलेले आदेश...त्यामुळे 'एटीएम'च्या व्यवस्थापन खर्चांत वाढ हेण्याची शक्यता असून, त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी संबंधित उद्योगाने एटीएमच्या शुल्कात वाढ करण्याची मागणी केलीये.

'कॉन्फेडरेशन ऑफ एटीए इंडस्ट्री'च्या (सीएटीएमआय) मते सध्या एटीएम उद्योग तोट्यात आहे. त्यातच एटीएमच्या अपग्रेडेशनमुळे खर्चांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एटीएम व्यवहार शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर तत्काल तोडगा काढण्याची मागणी 'सीएटीएमआय'ने केली आहे. एटीएम व्यवस्थापन खर्चात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच पुन्हा बँकांच्याही खर्चांत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, एटीएमचे शुल्क वाढल्यास बँकांच्या खर्चांतही ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या एटीएम उद्योग आधीच तोट्यात आहे. रोख व्यवहारांसाठी (कॅश ट्रॅन्झॅक्शन) केवळ १५ रुपयांचे आणि नॉन कॅश व्यवहारांसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क ग्राहकांकडून आकारले जात नाही. मोफत व्यवहारांची संख्या संपल्यानंतर जर ग्राहकाने अतिरिक्त व्यवहार केल्यास त्याला शुल्क द्यावे लागते. हे शुल्क २०१२मध्ये निर्धारित करण्यात आले. तेव्हापासून त्यात बदल करण्यात आले नाहीत.

हेही वाचा

प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

चार वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार,पाॅर्न व्हिडिओ पाहून केलं कृत्य

VIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार

First published: July 3, 2018, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading