तरुणाचा धक्कादायक दावा! पत्नीने गेल्या 10 वर्षांपासून केला बलात्कार आणि मानसिक छळ

तरुणाचा धक्कादायक दावा! पत्नीने गेल्या 10 वर्षांपासून केला बलात्कार आणि मानसिक छळ

'ती दिवस-रात्र माझ्यावर लैंगिक अत्याचार करते. मी जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा ती मला खूप ओरडते आणि मारहाण करते'

  • Share this:

कीव (युक्रेन), 18 मे : घरगुती हिंसाचाराची प्रकरणं सहसा महिलांविरूद्धच असतात. पण पुरुषांवर होणाऱ्या हिंसाचाराचं एक प्रकरण सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, गेल्या 10 वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यावर बलात्कार(Rape) करत आहे. फक्त लैंगिक छळच (Sexual violence) नाही तर मानसिक छळही केला जात असल्याचं या व्यक्तीते म्हटलं आहे. या प्रकरणाची सध्या मीडियावर चर्चा सुरू आहे.

बीबीसी युक्रेनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनमधील एका तरूणाने नाव न छापण्याच्या अटीवर आपली कहाणी लोकांसमोर आणली आहे. या युवकाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 10 वर्षांपासून त्याच्या पत्नीने त्याच्यावर बलात्कार केला आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने त्याला प्रपोज केलं आणि नंतर त्यांचं लग्न झालं. पीडित तरुण म्हणाला की, 'मी प्रथम इरा (पत्नी) सह लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण वारंवार सेक्स केल्यामुळे मला खूप त्रास झाली.'

मुंबई रंगली! रेल्वेनं केली आकर्षक पेंटिंग तर कर्मचाऱ्यांनी अशी केली स्वच्छता

नकार देऊनही पत्नी रोज करायची जबरदस्ती

या व्यक्तीने सांगितलं की, मी या रोजच्या लैंगिक छळाला कंटाळलो आहे, परंतु माझ्या नकारानंतरही ती मला रोज जबरदस्ती करते. मला हल्लीच समजलं की पुरुषांसुद्धा बलात्कार होऊ शकतात. व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, कार्यालयातून घरी आल्यावर आराम करायला गेलो तरी पत्नी मला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडते. मी नकार दिला तर मला मारुन टाकण्याची किंवा स्वत: मरण्याची धमकी द्यायची. ती दिवस-रात्र माझ्यावर लैंगिक अत्याचार करते. मी जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा ती मला खूप ओरडते आणि मारहाण करते.

लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी

पीडत तरुणाला अशी मिळाली मदत

या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, एका थेरपिस्टने त्याला मदत केली. तो या त्रासामुळे अनेक थेरेपिस्टना भेटला होता. पण त्यातल्या एकाने योग्य मदत केली. त्याने त्याचा सर्व त्रास डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांच्या मदतीने त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि पत्नीला समज दिली. त्यानंतर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली. तो दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्या आनंदाचा दिवस असल्याचं तरुणाने म्हटलं आहे.

एकाच कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू, लहान बाळासह अनेकजण अडकले

 

First published: May 18, 2020, 2:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या