मधुचंद्रासाठी नवविवाहिता आली मुंबईत.. प्रियकराच्या मदतीने चिरला पतीचा गळा

विवाहानंतर पतीसोबत मधुचंद्रासाठी मुंबई आलेल्या नवविवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 10:25 PM IST

मधुचंद्रासाठी नवविवाहिता आली मुंबईत.. प्रियकराच्या मदतीने चिरला पतीचा गळा

मुंबई, 29 जुलै- विवाहानंतर पतीसोबत मधुचंद्रासाठी मुंबई आलेल्या नवविवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मृत तरुण उत्तर प्रदेशातील रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवली (कानपूर) येथील राहणारा 27 वर्षीय हरिओम याचा विवाह रूरा येथील महोई गावात राहणारी प्रीतीशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच प्रीतीने हरिओमला दिल्ली जाऊन वेगळं राहण्यासाठी हट्ट धरला होता. 20 जुलैला प्रीती, हरिओमला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन घराबाहेर पडली. याबाबत तिने कोणत्याही नातेवाईकाला माहिती दिली नाही. दोघे मुंबईला आले.

पत्नीने उशीने दाबले तोंड, प्रियकराने दाबला गळा..

पनवेल पोलिसांनी सांगितले की, प्रीतीचा प्रियकर गौरव याने हरिओमला मुंबईत चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तिघे पळसपे (जि.रायगड) येथे पोहोचले. तिघांनी भाड्याने खोली घेतली. हरिओम झोपला असता प्रीतीने उशीने त्याचे तोंड दाबले. नंतर तिचा प्रियकर गौरव याने चाकूने हरिओमचा गळा चिरला. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिला. तिने आरडाओरड केल्यानंतर इतर लोक धावत आले. त्यांनी पनवेल पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी प्रीती आणि तिचा प्रियकर गौरव याला अटक केली आहे.

पिवळ्या साडीतील महिला कर्मचारी थिरकली 'टिप टिप बरसा पाणी..'वर, VIDEO व्हायरल

Loading...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-395230" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk1MjMw/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 10:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...