कुदळ घालून नवऱ्याला संपवलं, रात्रभर मृतदेह घराबाहेर ठेवला झाकून

कुदळ घालून नवऱ्याला संपवलं, रात्रभर मृतदेह घराबाहेर ठेवला झाकून

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे बायकोने नव-याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • Share this:

शिर्डी, 14 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे बायकोने नव-याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोपरगाव शहरातील बेट परीसरात असणाऱ्या मोहनीराजनगरमध्ये नात्याचा घोट घेणारी ही घटना घडली आहे. दारू पिऊन पती रोज मारहाण करायचा, रोड भांडायचा याला वैतागून पत्नीने पतीचा जीव घेतला. 46 वर्षीय रघुनाथ गायकवाड असं या मृत पतीचं नाव आहे. मध्यरात्री झालेली ही घटना सकाळी उघडकीस आली आणि त्यानंतर पोलीसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

शांताबाई गायकवाड असं या पत्नीचं नाव आहे. नवरा रोज भांडत असल्याने शांताबाई यांनी या सगळ्याला कंटाळून नवऱ्याच्या डोक्यात कुदळीचा घाव घातला. रक्तबंबाळ झालेल्या रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शांताबाई यांनी त्यांच्या पतीटचा मृतदेह घराजवळ पंचविस फुटांवर ओढत नेऊन त्यांच्या अंगावर चादर टाकली.

रात्री उशिरा घरी आलेल्या मुलाने वडिलांबद्दल विचारलं असता 'तूझे वडील दारू पिऊन झोपले आहेत' असं त्यांनी सांगितलं. पण सकाळ होताच मुलगा वडिलांना उठवायला गेला आणि सर्व धक्कादायक प्रकार त्याच्या उघडकीस आला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आरोपी शांताबाई गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे रघुराम यांच्या मुलाच्या मनावर मोठा घात झाला आहे. एकीकडे त्याने त्याच्या वडिलांना गमावलं तर दुसरीकडे आईला अटक झाल्याने त्याच्यावर दुखाचा डोंगर पडला आहे. कोपरगाव परिसरातही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

First published: August 14, 2018, 2:11 PM IST

ताज्या बातम्या