पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खरं प्रेम संपवलं, 'आईला का वाचवतो' म्हणून मुलावरही केला वार!

आईला वाचवण्यासाठी आलेला मुलगाही या घटनेत जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 02:24 PM IST

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खरं प्रेम संपवलं, 'आईला का वाचवतो' म्हणून मुलावरही केला वार!

वाशिम, 29 सप्टेंबर : प्रेमातून आणि नात्यातून गुन्हा होण्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असाच एक गंभीर प्रकार वाशिम जिल्ह्यात उघड झाला आहे. वाशिममधील चोरद गावात पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना रात्री 1:30  वाजताचे दरम्यान घडली आहे. आईला वाचवण्यासाठी आलेला मुलगाही या घटनेत जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरद गावातील विठ्ठल झाटे हा संशयी वृत्तीचा असल्याने वारंवार पत्नीसोबत वाद करायचा. शनिवारी रात्री झोपण्यापूर्वीही  त्याचं पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याचा राग मनात ठेवून विठ्ठलने मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना पत्नी शोभा झाटे ( वय 40 ) च्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. कुऱ्हाडीचा घाव वर्मी लागून मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे शोभा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

इतर बातम्या - 'मृत्यूचा मेन्यू' चायनीज दुकानावर झाला वाद, तरुणाला डोक्यात रॉड घालून केलं ठार!

आईवर वडील कुऱ्हाडीने वार करत असताना मोठा मुलगा अमर हा वडिलांना पकडण्यासाठी मधे आला असता त्यावरही आरोपी विठ्ठल यांनी कुऱ्हाडीने वार केले. त्यामध्ये तो ही जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी विठ्ठल हे फरार झाले. रविवारी सकाळी मंगरुळपीर ठाणेदार विनोद दोहरे आणि उपनिरीक्षक मंजू मोरे यांनी  मोठ्या शिताफीने येडशी कुंड या गावातून आरोपी विठ्ठल याला जेरबंद केलं आहे.

इतर बातम्या - समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू

Loading...

आरोपी विठ्ठल याने पत्नी शोभा यांची केवळ संशयावरून निर्घृण केल्यामुळे अमर, ममता, मोनिका आणि अक्षय ही 4 मुलं आई-वडिलांपासून पोरकी झाली आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Navratri 2019 : तुळशीच्या पानांनी सजली माऊली; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...