मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नवऱ्याने हात उगारल्याचा आला राग, पत्नीच्या हाती लागला हातोडा आणि...

नवऱ्याने हात उगारल्याचा आला राग, पत्नीच्या हाती लागला हातोडा आणि...

सत्यवती कॉलनीत राहणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आणि वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते.

सत्यवती कॉलनीत राहणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आणि वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते.

सत्यवती कॉलनीत राहणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आणि वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते.

कोल्हापूर, 15 जून: घरगुती वादातून पत्नीने डोक्यात हातोडा घालून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली आहे. मुलगा रोहित घेवदे याने आई विरूद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील सत्यवती कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. संजय तुकाराम घेवदे (वय 52) असं मृत पतीचे नाव आहे. घरगुती वादातून खून केल्याची कबुली पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात दिली आहे.

'सनीचा गेम केला, जंगलातून फेकून दिले', नागपुरात गँगवॉरमधून भयंकर घटना

याबाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सत्यवती कॉलनीत राहणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आणि वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते. संजय आणि पत्नी संगीता यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यामध्ये संजय हे खाली पडले. त्यावेळी पत्नी संगीता हिने घरातील लोखंडी हातोडा त्यांच्या डोक्यात घातला. यात  संजय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

या घटनेची फिर्याद नोंदवल्यावर घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेंद्र पाटील यांनी भेट देवून घेवदे यांना कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

VIDEO: इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि...

या प्रकरणी मुलाने आपल्या आईविरोधात पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Crime