मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /5 वर्षांपासून डायलेसिसवर असलेली बायको म्हणाली म्हणून विकले दागिने, सुरू केली गरजूंसाठी मोफत ऑक्सिजन सेवा

5 वर्षांपासून डायलेसिसवर असलेली बायको म्हणाली म्हणून विकले दागिने, सुरू केली गरजूंसाठी मोफत ऑक्सिजन सेवा

सर्वसाधारणपणे आपलं पोट भरल्यानंतर मदत करीत असल्याचं सर्रास पाहायला मिळतं. मात्र या दाम्पत्याचं काम अशा सर्वांसाठी एक मोठी चपराक आहे.

सर्वसाधारणपणे आपलं पोट भरल्यानंतर मदत करीत असल्याचं सर्रास पाहायला मिळतं. मात्र या दाम्पत्याचं काम अशा सर्वांसाठी एक मोठी चपराक आहे.

सर्वसाधारणपणे आपलं पोट भरल्यानंतर मदत करीत असल्याचं सर्रास पाहायला मिळतं. मात्र या दाम्पत्याचं काम अशा सर्वांसाठी एक मोठी चपराक आहे.

मुंबई, 1 मे : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. देशातील अनेक भागात रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना कारावा लागत आहे. अशात काही लोक संकट काळात फक्त स्वत:चा विचार न करता माणुसकी जपत आहेत. कोरोनाच्या रुग्णांसाठी एक मंडप डेकोरेटर पास्कल सल्धाना (Pascal Saldhana) देवासारखा धावून आला आहे. पत्नीने सांगितल्यानंतर पास्कल लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवित आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास अडथळा जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी लोक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. अशा कठीण काळात मदतीसाठी पास्कर पुढे आले. पास्कल सल्धाना गेल्या 18 एप्रिलपासून लोकांची मदत करीत आहेत. संकटाच्या या वेळी पास्कल सल्धाना लोकांना मोफत ऑक्सिजन सेवा पुरवित आहेत.

न्‍यूज एजन्सी एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितलं की, पत्नीने सांगितल्यानंतर पास्कलने हे सुरू केलं. पत्नीच्या म्हणण्यानुसार त्याने तिचे दागिने विकले. त्यानंतर 80 हजार रुपये जमा झाले. या पैशातून मी मोफत ऑक्सिजन सेवा सुरू केली. ते म्हणाले की, अनेकदा लोक मदत केल्याबद्दल पैसेही देतात. ते म्हणाले की, त्यांची पत्नी डायलिसिस आणि ऑक्सिजन सपोर्टवर आहे. याच कारणामुळे त्यांच्याजवळ आणखी एक सिलेंडर होता.

हेही वाचा-अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा

एकेदिवशी एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी पतीकडून ऑक्सिजन मागितला. पत्नीने सांगितल्यानंतर त्यांनी दुसरा सिलेंडर त्यांना देऊ केला. पास्कल यांच्या पत्नीच्या दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले असून गेल्या 5 वर्षांपासून त्या डायलिसिसवर आहेत. पास्कल सल्धाना ज्या प्रकारे लोकांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत, ते पाहून सर्वजणं त्यांचं कौतुक करीत आहे. पास्कल म्हणतात की, दु:खाच्या वेळी लोकांसोबत उभं राहिल्यामुळे दु:ख कमी होतं.

First published:

Tags: Corona updates, Mumbai, Oxygen supply, Positive story