Home /News /news /

अंतराळात पाठवल्या गेल्या फ्रेंच वाइनच्या 12 बाटल्या, काय आहे याचे रहस्य?

अंतराळात पाठवल्या गेल्या फ्रेंच वाइनच्या 12 बाटल्या, काय आहे याचे रहस्य?

फ्रान्सच्या उत्कृष्ट आणि उच्च प्रतीच्या बोर्दो रेड वाईन (Wine) या बाटल्या पुढील तीन वर्षांसाठी सहा अवकाश अभियानांत पाठवल्या जातील.

    नवी दिल्ली, 06 जानेवारी : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फ्रेंच वाईनच्या 12 बाटल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station- ISS) पोचवल्या गेल्या. सोशल मिडियावर अशी चर्चा आहे की, या वाईन वैज्ञानिकांना पिण्यासाठी पाठवल्या गेल्या आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही. दि इंडिपेन्डंटच्या अहवालानुसार, अंतराळात रेड वाईनच्या बाटल्यांवर काय परिणाम होतो हे शास्त्रज्ञांना शोधायचे आहे. या अहवालानुसार, फ्रान्सच्या उत्कृष्ट आणि उच्च प्रतीच्या बोर्दो रेड वाईन (Wine) या बाटल्या पुढील तीन वर्षांसाठी सहा अवकाश अभियानांत पाठवल्या जातील. या प्रयोगात फ्रान्सच्या बोर्दो युनिव्हर्सिटी, बवेरिया आणि लक्समबर्गमधील स्टार्टअप स्पेस कार्गो अनलिमिटेड हे भाग घेत आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणावर घेतली जाईल चाचणी वास्तविक, शास्त्रज्ञांना शोधण्याची इच्छा आहे की, जेव्हा वाइनच्या या बाटल्या एका शून्य ग्रॅव्हिटी (Zero Gravity) म्हणजे वेटलेसलेस आणि स्पेस रेडिएशन (Space Radiation) दरम्यान 1 वर्ष स्पेस स्टेशनमध्ये ठेवल्या जातात तेव्हा काय होते. त्यांची चव बदलेल का? त्या खराब होतील का? याची तुलना पृथ्वीवर समान तापमानात (18 डिग्री सेल्सिअस) ठेवलेल्या वाइनशी केली जाईल. इतर बातम्या - मनसे भविष्यात भाजपला देणार साथ? बाळा नांदगावकरांचं धक्कादायक विधान हा प्रयोग वाइन उद्योगात क्रांती आणेल? नासाच्या (NASA) म्हणण्यानुसार, हा प्रयोग अंतराळातील वातावरणामधील जटिल मल्टीकंपोनेंट द्रव्यांचे आयुष्य वाढवेल. अन्नासाठी नवीन स्वाद आणि गुण विकसित करणे हे या प्रयोगाचे ध्येय आहे. या बाटल्यांमध्ये भरलेल्या मद्याची चव आणि गुणवत्ता वाढल्यास वाइन उद्योगात नवीन क्रांती घडून येईल. अंतराळात वाईन पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी हा प्रयोग 1985 मध्ये फ्रेंच अंतराळवीरांनी डिस्कवरी शटलच्या किनाऱ्यावर चेटो लिंच बागेस (1975) ची बाटलीसोबत करण्यात आला होता. इतर बातम्या - लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या