परेल रेल्वे ब्रिजवर प्रवाशांची गर्दी का होते ?

परेल रेल्वे स्थानकावर पूर्वी येजा करण्यासाठी 2 ब्रिज होते. पण त्यातला एक पूल काढून टाकल्याने तिथं येजा करताना प्रवाशांची मोठी गर्दी होते.

Chandrakant Funde | Updated On: Sep 29, 2017 01:42 PM IST

परेल रेल्वे ब्रिजवर प्रवाशांची गर्दी का होते ?

मुंबई, 29 सप्टेंबर : यापूर्वी परळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडायला 2 पूल होते. दुसरा पूल पूर्वेला बाहेर पडत असे. मात्र काही कारणाने तो हटवला गेला आणि आता परळ स्टेशन प्लेटफॉर्मवरून बाहेर यायला हा एकमेव पूल उरलाय. परळ टर्मिनल बनवायचं असल्यामुळे परळ स्टेशनवर नवा पूल टाकला जात नाहीये. त्यामुळे दोन पुलांवरच्या गर्दीचा भार एकाच पुलावर पडलाय. त्यामुळे हल्ली इथं दररोज ऑफिस भरताना आणि सुटताना भयंकर गर्दी होते. अशातच गेल्या 5 वर्षात परळ भागात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्याची नवी कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, या वाढीव गर्दीला स्टेशनबाहेर पडण्यासाठी नवापूल उभारला जात नाही त्याचाच परिपाक म्हणून आजही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलीय. त्यात 22 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी कूर्ला रेल्वे स्थानकाचीही गर्दीच्या बाबतीत काहिशी अशीच परिस्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close