'या' कारणांसाठी राहुल गांधींनी निवडला वायनाड मतदारसंघ

वायनाड मतदार संघाची निवड करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 12:20 PM IST

'या' कारणांसाठी राहुल गांधींनी निवडला वायनाड मतदारसंघ

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली.

राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाड येथूनही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

Loading...

बालेकिल्ला अमेठीतच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींविरोधात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा 'अझहरजी' असा आदरार्थी उल्लेख केल्यानं त्यांच्यावर चौफेरी टीका सुरू आहे.

राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन वायनाडमधून निवडणूक लढवण्याला होकार दिला.

राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन वायनाडमधून निवडणूक लढवण्याला होकार दिला.

 वायनाड मतदार संघाची निवड करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडतो.

वायनाड मतदार संघाची निवड करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडतो.

दक्षिणेती तीन राज्यांचं त्रिकोण असलेल्या या मतदारसंघाची निवड केल्यामुळे तिन्ही राज्यातील कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदार संघात कन्नूर, मलाप्पूरम आणि वायनाडचा समावेश असून २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे.

अतिशय सुरक्षित अशीही ही जागा असून काँग्रेससाठी लोकसभेत विजयी होण्याचा मार्ग आहे.

2016 च्या मतदार यादीनुसार 13 लाख 47 हजार 647 मतदार आहेत. या मतदार संघात 1089 मतदार केंद्र आहेत. 2014 मध्ये इथे 73.74 टक्के मतदान झालं होतं.

या लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतदारांची बऱ्यापैकी संख्या आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त दहा टक्के मतं मिळाली होती. सोबतच या मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ज्यादा आहे.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता.

केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनीही दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली अशी आठवण करून देत आता राहुल गांधीही दोन ठिकाणाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मागच्या 2014  च्या निवडणुकीत अमेठीमधून स्मृती इराणी यांचा पराभव झाला होता. याही वेळी स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...