मनी लाँड्रिंग प्रकरणी आशिष शेलारांवर कारवाई का होत नाही? -प्रीती मेनन

"आशिष शेलार यांना कोण वाचवतंय. जर बाबा सिद्दीकींवर कारवाई केली जाते. मग आशिष शेलार यांच्यावर का नाही ?"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2017 02:47 PM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणी आशिष शेलारांवर कारवाई का होत नाही? -प्रीती मेनन

17 जून : आशिष शेलार यांनी मनी लाँड्रिंग केलं आहे. आशिष शेलार यांना कोण वाचवतंय. जर बाबा सिद्दीकींवर कारवाई केली जाते. मग आशिष शेलार यांच्यावर का नाही ? असा सवाल आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मुंबईचे शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला.

जुलै 2016 मध्ये आपने आशिष शेलारांविरोधात मनी लाँडरिंगची तक्रार केली होती. पण अजून कोणतीही कारवाई झाली नाही.

आमच्या तक्रारीची दखल कोणी घेत नाहीये.  भुजबळ यांचा जो एक पार्टनर आहे तोच आशिष शेलार यांचा पार्टनर आहे असा आरोपही प्रीती मेनन यांनी केला.

तसंच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे,अर्जुन खोतकर,चंद्र शेखर बावनकुळे,दीपक सावंत,दिवाकर रावते,गिरीश बापट,गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,जयकुमार रावल, पांडुरंग फुंडकर,प्रकाश मेहता,पृथ्वीराज देशमुख,रणधीर सावरकर,रणजित पाटील,रवींद्र चव्हाण,रवींद्र वायकर,संभाजी पाटील निलंगेकर,सुभाष देशमुख, विनोद तावडे,विष्णू सावरा हे सर्व मंत्री घोटाळेबाज लोक प्रतिनिधी आहेत या विरोधात आम्ही तक्रार केली आहे असंही प्रीती मेनन यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 02:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...