मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मंत्रालयात का जात नाही? अखेर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर...

मंत्रालयात का जात नाही? अखेर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर...

कोकणात गेलो होतो, विदर्भात तर अधिवेशनच झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रही फिरलो आहे. सगळीकडे मी फिरत होतोच. हे काही मला नवीन नाही. मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती

कोकणात गेलो होतो, विदर्भात तर अधिवेशनच झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रही फिरलो आहे. सगळीकडे मी फिरत होतोच. हे काही मला नवीन नाही. मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती

कोकणात गेलो होतो, विदर्भात तर अधिवेशनच झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रही फिरलो आहे. सगळीकडे मी फिरत होतोच. हे काही मला नवीन नाही. मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 नोव्हेंबर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) 'मातोश्री'तून बाहेर पडत नाही, मंत्रालयात जात नाही? अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. पण, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टीकेला चोख उत्तर दिले आहे.   'हे करू नका, ते करू नका असं मी सांगतोय आणि मीच फिरतोय हे योग्य नव्हे' असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनामध्ये विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्षभरातील मुख्यमंत्री म्हणून आलेला अनुभव आणि कामाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. त्याच बरोबर मंत्रालयात जात का नाही, स्वत: कार का चालवता, अशा प्रश्नांची उत्तरं ही दिली.

आपल्या निमित्तानं मंत्रालयावर भगवा फडकला आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, असा आरोप आहे. कधी जाणार मंत्रालयात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता, मुख्यमंत्री म्हणाले की,  'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आतासुद्धा जाऊ शकतात, पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, शेवटी कामं होणं महत्त्वाचं. एका ठिकाणी जाऊन बसणं म्हणजेच सर्व काही नाही. तुम्ही मंत्रालयात जाऊन बसलात आणि केलं काहीच नाही. मी मागेसुद्धा बोललो होतो की, काही न करता फिरणं आणि न फिरता बरंच काही करणं यात फरक आहे. तसंच मंत्रालयामध्येसुद्धा.

मग का जात नाही?, 'याचं कारण मी स्वतःच स्वतःवर का थोडीशी बंधन घालतो आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की, हे करू नका, ते करू नका आणि मी फिरतोय हे योग्य नव्हे. मी कुठेही जाणं म्हणजे सगळा लवाजमा येणं, गर्दी येणं. आता हळुवार या सगळ्या गोष्टी उघडलेल्या आहेत. कोरोना येण्याआधी माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच. कोकणात गेलो होतो, विदर्भात तर अधिवेशनच झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रही फिरलो आहे. सगळीकडे मी फिरत होतोच. हे काही मला नवीन नाही. मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती' असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

संजय राऊत - मातोश्रीचं एक पावित्र्य आहे, महत्त्व आहे आणि प्रतिष्ठा आहे. ‘वर्षा’ बंगल्याचा अनुभव काय आहे?

मुख्यमंत्री – ध्यानीमनी नसताना हे पूर्वजांच्या पुण्याईने लाभलेलं वैभव आहे. ‘वर्षा’ जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे… अनेक जण स्वप्न पाहत पाहत बिचारे असेच जातात… आणि मनापासून सांगतो की, मी तिथपर्यंत कसा पोहोचलो हे अजूनही एक प्रश्नचिन्हच आहे, पण ‘वर्षा’ या वास्तूमध्येसुद्धा आपुलकी आणि जिव्हाळ्याचं वातावरण आहे. अनेकदा वास्तूच बोलत असते आपल्याशी काही वेळेला… आणि त्या वास्तूचे आशीर्वादही या सरकारला मिळालेले आहेत. वास्तूचे आशीर्वाद असावेच लागतात… नाहीतर उगाच पुणी गेलं आणि त्या वास्तूचा काहीतरी अनादर केला तर त्या वास्तुदेवतेलाही ते बरं वाटणार नाही. म्हणून हे जे वैभव आहे, त्याचा मी अत्यंत नम्रतेने स्वीकार करून त्या वैभवाचा उपयोग महाराष्ट्राला कसा करता येईल, ते करतो आणि म्हणून मी दिवसभर ‘वर्षा’त माझ्या ऑफिसमध्ये असतो. अनेक महत्त्वाच्या विषयांवर बैठका होतात… अनेक जणांना मी तिथे भेटत असतो. व्हिडीओ कॉन्फरन्सेस होतात. त्या फिरणाऱ्या लोकांना कळत नाही, पण मी एका जागी बसून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतो आणि एकाग्रतेने ते निर्णय मला तिथे घेता येतात.

संजय राऊत - म्हणजे तुमच्यासाठी लॉकडाऊन केव्हाच उठलेला आहे.

मुख्यमंत्री – माझ्याकडे जनतेच्या ज्या काही तक्रारी किंवा ज्या काही अपेक्षा असतात त्या निवेदनाच्या माध्यमातून येतात. त्याही तत्काळ मार्गी लावतो.

संजय राऊत - तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला?

मुख्यमंत्री – वर्षभरात एक मोठा बदल झाला तो म्हणजे मी माझ्या शिवसैनिकांपासून अर्थात त्यांच्या भेटींपासून थोडा दुरावलोच. प्रत्यक्ष भेटींचा दुरावा जाणवतोय आणि त्याला कारण केवळ मुख्यमंत्रीपद नाहीय. साहजिकच आहे, कोरोना हे त्याचं एक मुख्य कारण आहे. हे जे काय आपण बिल्ले लावून बसलोय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ त्यामुळे सगळ्यांच्याच गाठीभेटी या थांबल्या होत्या, पण गेल्या काही दिवसांपासून मी पुन्हा प्रथम माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला आता सुरुवात केली आहे. हळूहळू आता इतरांनाही भेटेन. जर मी एकदम सगळं उघड केलं, गाठीभेटी उघड सुरू केल्या तर मला त्यांच्याही जिवाची काळजी आहे. कारण ते उत्साहात भेटायला येतात.

संजय राऊत - महाराष्ट्राने प्रथमच असा मुख्यमंत्री पाहिला की तो स्वतः ड्रायव्हिंग करत मंत्रालयात जातो. सह्याद्रीवर जातो. वर्षावर जातो.

मुख्यमंत्री – अहो, पंढरपूरलाही गेलो होतो, पुण्याला गेलो होतो.

संजय राऊत - हे चित्र महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. हे चित्र तसं प्रेरणादायी आहे. गंमतीचंसुद्धा आहे आणि मुख्यमंत्र्याचे पाय जमिनीवर आहेत हे दाखवणारं आहे.

मुख्यमंत्री – जमिनीवर आहेत, क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत आणि एक्सिलेटरवरही आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे.

संजय राऊत - तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?

मुख्यमंत्री – सांगतो. कोरोनाचं संकट आलं आणि साहजिकच आहे, अंतर ठेवा हा नियम लागला. गाडीत जास्त माणसं नको. मग मी विचार केला की, माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचं, किती बंधनं ठेवायची. मग प्रत्येकवेळी त्यांची कोरोना टेस्ट करा. तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे. पण असं काही नाही की मी गाडी चालवतच राहीन. ठीक आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत गाडीत नुसता बसून प्रवास करेन. मुख्यमंत्रीपद त्याची प्रभावळ काहीजण मानतात, पण तसं काही नाहीच. मुख्यमंत्रीसुद्धा माणूसच असतो. पंतप्रधानही माणूसच असतो. फक्त आपल्यातली माणुसकी कुणी घालवू नये, जाऊ देऊ नये, हे ज्याने त्याने पाहायला पाहिजे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यातली, पंतप्रधानातली माणुसकी मरेल त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा तो मुख्यमंत्री कामाचा नाही.

संजय राऊत - प्रशासनावर मांड ठोकल्याशिवाय राज्य चालवता येत नाही.

मुख्यमंत्री – सांगतो ना, मी मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजाला सुरुवात केल्यानंतर कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं. गेल्या शंभर वर्षांनंतर आलेलं महाभयानक संकट होतं. त्यात माझ्या तिन्ही पक्षांच्या सहकाऱयांनी आणि जे सरकारचे समर्थक आहेत, मग ते बच्चू कडू आहेत. सगळेच. त्यांनी जे सहकार्य मला केलं त्यामुळेच मी काम करू शकलो. अगदी समजून उमजून आम्ही जो काही कारभार करतो आहोत. एकजिनसीपणा जो काही आलेला आहे त्यामुळे तर हे शक्य झालंय.

First published: