Elec-widget

अमित शहांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इतका विश्वास का?

अमित शहांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इतका विश्वास का?

नरेंद्र मोदी - अमित शहा यांचं नातं 30 वर्षे जुनं आहे. दोघांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार देखील पाहिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मे : देशाच्या राजकारणात सध्या दोन नाव आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा! 2014मध्ये मोदी – शहा जोडीनं झंझावती प्रचार केला आणि भाजप सत्तेत आलं. पण, अनेकांना प्रश्न पडला की नरेंद्र मोदी अमित शहांवर एवढा विश्वास का ठेवतात? अनिल राय यांनी आपल्या 'शॅडो पॉलिटिक्स' या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे.

काय आहे अमित शहा - नरेंद्र मोदींचं नात?

2013मध्ये अमित शहा वाराणसी दौऱ्यावर होते. त्यावेळी अमित शहा नरेंद्र मोदींच्या जवळचे होते. आरएसएसच्या सांगण्यावरून हा दौरा करण्यात आला होता. यावेळी अमित शहा यांच्या खांद्यावर संघानं मोठी जबाबदारी टाकली होती. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभेची  सुरक्षित जागा शोधण्याचं काम अमित शहा यांनी केलं. सर्व गोष्टींचा विचार करून अमित शहा यांनी वाराणसी हा लोकसभेचा मतदारसंघ नरेंद्र मोदींसाठी निश्चित केला. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लढणार असल्याचं निश्चित झालं.

अमित शहांवर होता विश्वास

गुजरातमध्ये सत्तेची हॅटट्रिक साधण्यामध्ये अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे पक्ष, नरेंद्र मोदी आणि संघाचा अमित शहांवर विश्वास होता. वारणसीच्या जागेवरून मुरली मनोहर जोशी हे विजयी होत होते. पण, अमित शहा यांनी ती जबाबदारी देखील पार पाडली. शहा यांनी ठरवल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसी या मतदारसंघाची निवड करण्यात आली. तर, जोशी यांना कानपूरमधून उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झालं.

Loading...

काय आहे मोदी-शहा यांचं नातं?

नरेंद्र मोदी – अमित शहा यांचं नातं 30 वर्षे जुनं आहे. दोघांची भेट 1982मध्ये संघाच्या शाखेत झाली. ज्यावेळी अमित शहा नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा त्याचं वय 17 वर्षे होतं. तर, नरेंद्र मोदी संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. यावेळी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी नरेंद्र मोदी यांना भाजपमध्ये सक्रीय होण्यास सांगितले. त्यावेळी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यांनी नरेंद्र मोदींना राजकारणात सक्रीय होण्यास सांगितले.

नरेंद्र मोदींचा अमित शहांवर विश्वास का?

सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहांना तुरूंगात जावं लागलं. तेव्हाचा काळ नरेंद्र मोदींसाठी खडतर होता. कारण, अमित शहांना साक्षीदार बनवून काँग्रेस नरेंद्र मोदी यांना तुरूंगात पाठवू इच्छिते, अशी चर्चा रंगली होती. पण, तुरूंगातून अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी निरोप पाठवला. काहीही झालं तरी मी बधणार नाही. मी दबावाला बळी पडणार नाही.

अमित शहा जेलमध्ये असताना दोघांच्या नात्याची खरी परिक्षा होती. एका बाजुला अमित शहा यांनी नरेंद्र मोदींविषयी आपल्याला काय वाटतं हे आपल्या वागण्यातून स्पष्ट केलं. तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या भविष्याचा देखील विचार केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शहा यांना विवेकानंद यांची पुस्तक वाचण्यास सांगितले. अमित शहा यांनी 3 महिन्याच्या काळात स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचून काढली.

उत्तर प्रदेश कशी झाली कर्मभूमी

सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहा पूर्णता फसले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. न्यायालयानं अमित शहा यांना जामीन दिला. पण, गुजरातमध्ये प्रवेश बंदी केली. त्यामुळे दोघांपुढे नवा पेच निर्माण झाला. कारण, महत्त्वाच्या कामांची जास्त जबाबदारी ही अमित शहा यांच्या खांद्यावर होती. पण, नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी दाखवत उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला अमित शहा यांना दिला. अमित शहा यांनी तसंच केलं. त्यांनी उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष केलं.

अमित शहा का झाले भाजपचे अध्यक्ष?

2014मध्ये विजयी झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे निश्चित होतं. त्यानंतर त्यांनी अमित शहा यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बसवलं. पण, यावेळी सोहराबुद्दीन फेक एन्काऊंटर प्रकरण, बंगळूरूतील तरूणीवर ठेवलेले पाळत प्रकरण पुढे येऊ लागले. पण, नरेंद्र मोदी मात्र अमित शहांच्याबाबत घेतलेल्या निर्णयावर निश्चयावर ठाम होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना अमित शहा यांनी मोदींच्या 12 वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडली होती. अमित शहा यांना नरेंद्र मोदींचा 'नाईट वॉचमन' म्हणून देखील ओळखलं जातं.

मोदींची समजूत काढण्यात शहा होतात यशस्वी

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना अमित शहा असे एकमेव मंत्री होते जे मोदींची समजूत काढण्यात यशस्वी होत. राज्यात धर्म बदलाबाबत केलेल्या कायद्यामागे अमित शहा यांचं डोकं होतं असं मानलं जातं. त्यानंतर संघाचा देखील अमित शहा यांच्यावरील विश्वास वाढला.


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...